पुणे महानगरपालिकेचा बिगारी, वर्ग 4 चा कर्मचारी 1 लाख रुपयांची लाच घेताना सापडला आहे!

पुणे महानगरपालिकेचा बिगारी, वर्ग 4 चा कर्मचारी 1 लाख रुपयांची लाच घेताना सापडला आहे! लाचखोर सरकारी कर्मचारी, दुसऱ्या निवृत्त सरकारी कर्मचाऱ्याने पकडुन दिला ! ठिकाण :- पुणे महानगरपालिकेच्या आवारात. थोडक्यात माहिती :- यातील तक्रारदार हे आरोग्य विभाग, पुणे मनपा येथून मुकादम म्हणून सन २०२२ मध्ये सेवानिवृत्त झाले असून, त्यांच्या शिल्लक अर्जित रजेच्या रोखीकरणाचा बिलाचा चेक देणेसाठी पुणे ३०/०६/२०२३ महानगरपालिकेतील लोकसेवक प्रविण पासलकर यानी रक्कम रुपये १,००,०००/- (एक लाख रुपये) लाचेची मागणी केल्याची तक्रार तक्रारदार यांनी ला.प्र.वि. पुणे येथे दिली होती. तक्रारदारांनी दिलेल्या तक्रारीची पडताळणी केली असता, लोकसेवक प्रविण पासलकर यानी चेक देणेसाठी तक्रारदाराकडे १,००,०००/- रुपयांची लाच मागणी करुन, लाच रक्कम पुणे महानगरपालिकेच्या आवारात पंचासमक्ष स्विकारल्यावर लोकसेवक प्रविण पासलकर याना रंगेहाथ पकडण्यात घेण्यात आले असून, शिवाजीनगर पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे गुन्हा नोंद करण्याची कार्यवाही सुरु आहे. ला. प्र. वि. पुणे येथील पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे तपास करत आहेत. सदरच...