कामगार उपायुक्त कार्यालयातील दुकान निरीक्षक निशा आढाव यांना पाच हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.
कामगार उपायुक्त कार्यालयातील दुकान निरीक्षक निशा आढाव यांना पाच हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.
मागच्याच आठवड्यात मनपा शिक्षण अधिकारी सुनीता धनगर यांना पकडले होते, आज पुन्हा एका महिला अधिकारी लाच घेताना जाळ्यात सापडल्याने लाचखोरीत महिला देखील मागे नसल्याचा प्रत्यय येत आहे,
तक्रारदार यांचे हॉटेल असून हॉटेलमध्ये बालकामगार असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर कामगार उपायुक्त कार्यालयातील दुकान निरीक्षक निशा आढाव यांनी हॉटेल चालकास बालकामगार नसल्याचा निरंक अहवाल देण्यासाठी पाच हजार रुपये ची लाच मागितली होती तक्रारदाराने याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे वालावलकर अप्पर अधीक्षक माधव रेड्डी उपाध्यक्ष नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक अनिल बडगुजर पोलीस नाईक मनोज पाटील शितल सूर्यवंशी अजय गरुड यांच्या पथकाने सापळा रचला त्यात निशा आढाव कामगार उपायुक्त कार्यालयात पाच हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ जाळ्यात अडकल्या. याबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
● एसीबी म्हणजे काय आणि तक्रार कशी करावी याविषयीची माहिती पुढील लिंकवर आहे,
http://www.jagrukhouyat.com/2023/03/anti-corruption-bureauacb.html
========================================
● अशाचप्रकारे कोणकोणत्या प्रकरणात धमकी देऊन लाच मागितली जाते त्याची माहिती पुढे मिळेल.
http://www.jagrukhouyat.com/2023/04/blog-post.html
========================================
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा