Occupancy Certificate म्हणजेच "भोगवटा प्रमाणपत्र" देण्याची बिल्डरची जबाबदारी आहे. - सर्वोच्च न्यायालय

भोगवटापत्र म्हणजेच ऑक्युपेशन सर्टिफिकेट वेळेत मिळवून देण्याची जबाबदारी बिल्डरने पार न पाडल्यास त्याने फ्लॅटधारकाला नुकसान भरपाई द्यावी, हा ‘राष्ट्रीय ग्राहक मंचा’चा निकाल, सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. बांधलेल्या सदनिकेचे भोगवटापत्र म्हणजेच ऑक्युपेशन सर्टिफिकेट वेळेत मिळवून देण्याची जबाबदारी बिल्डरने पार न पाडल्यास त्याने फ्लॅटधारकाला नुकसान भरपाई द्यावी, हा ‘राष्ट्रीय ग्राहक मंचा’चा निकाल ग्राहकांना बहुमोल दिलासा देणारा आहे. मुंबईतील एका प्रकरणात निकाल देताना संबंधित बिल्डरने ग्राहकाला ४३ लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचा आदेशही मंचाने दिला असून हे प्रमाणपत्र मिळून देईपर्यंत दरमहा भाड्यापोटी तब्बल नव्वद हजार रुपये देण्याची सूचनाही केली आहे. या निकालाने फ्लॅटधारकांना दिलासा मिळणे स्वाभाविक आहे. बांधकाम उद्योग हा गृहस्वप्नाशी जोडला असल्याने ग्राहक अधिक संवेदनशील असतो. प्रसंगी तो हतबलही असतो. त्याचा फायदा घेऊन काही बिल्डर फसवणूक करतात. फसवणूक झालेले फ्लॅटधारक लाखांच्या संख्यने असतील. घर मिळविण्याची घाई झालेले ग्राहक कागदपत्रांची पूर्तता नंतर होईल या भरवशावर, बिल्डर दे...