मेंटेनन्सचा हिशोब देणे बिल्डरला बंधनकारक आहे!

मेंटेनन्सचा हिशोब देणे बिल्डरला बंधनकारक आहे!

#गृहनिर्माण_संस्था_पोस्ट_क्रमांक_6_ऑफ_45

● बिल्डरने सोसायटीची नोंदणी न करता बेकायदेशीरपणे घेण्यात आलेला देखभाल खर्च●

मित्रांनो घर घेताना बिल्डरने घेतलेल्या आगाऊ रक्कमेचा हिशेब घ्या, जागे व्हा, जागरूक व्हा!

घर घेताना बिल्डर प्रत्येक फ्लॅट धारकांकडून खालीलप्रमाणे लाखो रुपयांची अतिरिक्त रक्कम घेत असतात.

▪️महावितरण खर्च,     ▪️सोसायटीची नोंदणी फी.
▪️क्लब हाऊस चार्जेस,▪️2 वर्षांचा आगाऊ मेंटेनन्स. ▪️डेव्हलपमेंट चार्जेस,  ▪️इन्फ्रा चार्जेस.
▪️लीगल फी.              ▪️वन टाईम मेंटेनन्स.

☑️ बिल्डर आशा अनेक प्रकारे सगळ्या फ्लॅटधारकांच्या कडून पैसे घेतात,

त्यामुळे ही रक्कम करोडोंच्या घरात जाते मात्र हिशेब कोणीच विचारत नाही आणि हिशेब कोणी विचारत नाही त्यामुळे बिल्डरही देतही नाहीत. 

हिशोबाचे राहूदे बिल्डर त्यांची खालील जबाबदारी सुद्धा पार पाडत नाहीत, 

👉 घेतलेल्या पैश्यांचा हिशोब देत नाहीत.
👉 बिल्डर सोसायटी बनवून देत नाहीत.
👉 कन्व्हेयन्स डिड करून देत नाहीत.

☑️ वरील सगळ्या प्रकारे घेतलेल्या पैश्यांचा हिशेब देणं तसेच सोसायटी बनवून देणं, कन्व्हेयन्स डिड करून देणं, हे मोफा कायद्यांतर्गत बिल्डरांनी करून देणं बांधकारक आहे.

★मित्रांनो कोणताही फ्लॅटधारक वरील प्रकारे घेतलेल्या पैश्यांचा हिशेब देण्याची लेखी मागणी जिल्हाउपनिबंधक यांना करू शकतो यासाठी सोबत जोडलेली बातमी पूर्ण वाचा, मार्गदर्शन घ्या, चर्चा करा.★
(फोटो दिसत नसेल तर मोबाईल गॅलरीत सेव्ह करून वाचा) 

▪️मित्रांनो आपण वाचन करणं विसरलो आहे.
▪️आपण लेखी जाब विचारणे विसरलो आहे.
▪️आपण पत्रव्यवहार करणे विसरलो आहेत.
▪️आपण चर्चा करणे विसरलो आहे.
▪️आपल्याला चुकीचं होतेय हे माहिती असतानाही आपण तोंडी जाब विचारतो आणि वाद होतात.
▪️त्यामुळे मूळ महत्त्वाचा विषय बाजूला राहतो आणि भलतीकडेच आपला वेळ वाया जातो.
▪️खूप ठिकाणी मुद्धाम जाणीवपूर्वक काही लोकं वाद करतात व इतर फ्लॅटधारक अलगद आशा लोकांच्या जाळयात अडकतो.
▪️आशा वाद करणाऱ्या लोकांना कोणाची तरी फूस असते
▪️मित्रांनो आपली मानसिकता सुद्धा बदलणे आवश्यक आहे.
▪️आपली मानसिकता बघू जेव्हा अडचण येईल तेव्हा अशी झाली आहे.

मित्रांनो, जागरूक नागरिक होऊन समाजातील अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार, कमी करणे आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे त्यासाठी, वाचन, चिंतन, मनन, सकारात्मक चर्चा आवश्यक आहे.

अशीच नवनवीन माहिती वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम, वेबसाईट या सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॉटफॉर्मवर अवश्य फॉलो करा.

========================================

Follow us on,


टेलिग्राम- 

इंस्टाग्राम-@jagruk_houyat. 

वेबसाईट-

फेसबुक ग्रुप- 

वॉट्सअप चॅनेल-

वॉट्सआप ग्रुप-

फेसबुक पेज -

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वीज ग्राहकांचे अधिकार! ग्राहकांनी तक्रार कुठे करावी!

कागदपत्रे नोटरी करणेसाठी जाता तेव्हा किती फी देता? त्याची पावती घेता का? नोटरी बोगस तर नाही ना?

माहितीचा अधिकार कायदा 2005 (RTI-Right to Information Act 2005) म्हणजे काय?