पुणे महानगरपालिकेचा बिगारी, वर्ग 4 चा कर्मचारी 1 लाख रुपयांची लाच घेताना सापडला आहे!

पुणे महानगरपालिकेचा बिगारी, वर्ग 4 चा कर्मचारी 1 लाख रुपयांची लाच घेताना सापडला आहे!

लाचखोर सरकारी कर्मचारी, दुसऱ्या निवृत्त सरकारी कर्मचाऱ्याने पकडुन दिला!
ठिकाण :- पुणे महानगरपालिकेच्या आवारात. 
थोडक्यात माहिती :- यातील तक्रारदार हे आरोग्य विभाग, पुणे मनपा येथून मुकादम म्हणून सन २०२२ मध्ये सेवानिवृत्त झाले असून, त्यांच्या शिल्लक अर्जित रजेच्या रोखीकरणाचा बिलाचा चेक देणेसाठी पुणे ३०/०६/२०२३ महानगरपालिकेतील लोकसेवक प्रविण पासलकर यानी रक्कम रुपये १,००,०००/- (एक लाख रुपये) लाचेची मागणी केल्याची तक्रार तक्रारदार यांनी ला.प्र.वि. पुणे येथे दिली होती. 

तक्रारदारांनी दिलेल्या तक्रारीची पडताळणी केली असता, लोकसेवक प्रविण पासलकर यानी चेक देणेसाठी तक्रारदाराकडे १,००,०००/- रुपयांची लाच मागणी करुन, लाच रक्कम पुणे महानगरपालिकेच्या आवारात पंचासमक्ष स्विकारल्यावर लोकसेवक प्रविण पासलकर याना रंगेहाथ पकडण्यात घेण्यात आले असून, शिवाजीनगर पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे गुन्हा नोंद करण्याची कार्यवाही सुरु आहे. ला. प्र. वि. पुणे येथील पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे तपास करत आहेत. 

सदरची कारवाई मा.पोलीस उप आयुक्त / पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे, ला.प्र.वि. पुणे परिक्षेत्र, मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती. शीतल जानवे, ला.प्र.वि. पुणे यांचे मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.

लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे कार्यालयास खालील नमूद क्रमांकवर सपंर्क साधण्याचे आवाहन श्री. अमोल तांबे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. पुणे यांनी केले आहे.
१. हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक १०६४

२. अॅन्टी करप्शन ब्युरो, पुणे दुरध्वनी क्रमांक ०२०-२६१२२१३४, २६१३२८०२, २६०५०४२३ 

३. व्हॉट्स अॅप क्रमांक पुणे - ७८७५३३३३३३

४. व्हॉट्स अॅप क्रमांक मुंबई ९९३०९९७७०० 

५. ई-मेल आयडी पुणे dyspacbpune@mahapolice.gov.in

६. वेबसाईट www.acbmaharashtra.gov.in 

७. ऑनलाईन अॅप तक्रार www.acbmaharashtra.net.in

● एसीबी म्हणजे काय आणि तक्रार कशी करावी याविषयीची माहिती पुढील लिंकवर आहे,


● अशाचप्रकारे कोणकोणत्या प्रकरणात धमकी देऊन लाच मागितली जाते त्याची माहिती पुढे मिळेल.


मित्रांनो, जागरूक नागरिक होऊन समाजातील अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार, कमी करणे आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे त्यासाठी, वाचन, चिंतन, मनन, सकारात्मक चर्चा आवश्यक आहे.

अशीच नवनवीन माहिती वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम, वेबसाईट या सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॉटफॉर्मवर अवश्य फॉलो करा.

Follow us on,

फेसबुक- 

वेबसाईट-

फेसबुक ग्रुप- 

टेलिग्राम- 

इंस्टाग्राम-@jagruk_houyat. 

फेसबुक पेज -






टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वीज ग्राहकांचे अधिकार! ग्राहकांनी तक्रार कुठे करावी!

कागदपत्रे नोटरी करणेसाठी जाता तेव्हा किती फी देता? त्याची पावती घेता का? नोटरी बोगस तर नाही ना?

माहितीचा अधिकार कायदा 2005 (RTI-Right to Information Act 2005) म्हणजे काय?