पोस्ट्स

प्रसिध्दी साठी लेबलसह पोस्ट दाखवत आहे

वित्त विभागाने बाह्य यंत्रेणेद्वारे कामे करून घेण्यासाठी नऊ कंपन्या / संस्थेबरोबर (ठेकेदारामार्फत) करार केला असल्याचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून अति कुशल, कुशल, अर्ध कुशल, अकुशल इत्यादी तत्सम मनुष्यबळ पुरवठा सेवा पुरवताना खालील अटी शर्ती, सूचनांचे पालन व त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे बाबत.

इमेज
प्रति, माननीय मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य  वित्त विभाग, महाराष्ट्र शासन  सामान्य प्रशासन विभाग, महाराष्ट्र शासन कामगार विभाग, महाराष्ट्र शासन गृह विभाग, महाराष्ट्र शासन विषय : वित्त विभागाने बाह्य यंत्रेणेद्वारे कामे करून घेण्यासाठी नऊ कंपन्या / संस्थेबरोबर (ठेकेदारामार्फत) करार केला असल्याचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून अति कुशल, कुशल, अर्ध कुशल, अकुशल इत्यादी तत्सम मनुष्यबळ पुरवठा सेवा पुरवताना खालील अटी शर्ती, सूचनांचे पालन व त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे बाबत. सस्नेह जय महाराष्ट्र, महोदय / महोदया, शासनाच्या वित्त विभागाने नुकतेच परिपत्रक काढले असून, याबाबत कशा पद्धतीने कार्यवाही करावी हे स्पष्ट केले आहे. राज्य सरकारने बाह्ययंत्रणेकडून कामे करुन घेण्यासाठी नऊ सेवा पुरवठादार संस्थांची नियुक्ती केली आहे. त्यांच्याकडून अतिकुशल, कुशल, अर्धकुशल व अकुशल मनुष्यबळाचा पुरवठा करण्यात येणार आहे. वित्त विभागाच्या संबंधित परिपत्रकासंबंधीत विषयाच्या अनुषंगाने खालील नमूद अटी शर्तींचा सूचनांचा विचार करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे बाबत संबंधित विभाग यांचेकडून ता...