रेल्वे प्रवासात हे आजार असणाऱ्या रुग्णांना किती मिळते सवलत?
■ रेल्वे प्रवासात हे आजार असणाऱ्या रुग्णांना किती मिळते सवलत?
● दिव्यांग व्यक्तींना सवलत.
इतरांच्या मदतीशिवाय प्रवास करू न शकणाऱ्या दिव्यांग व्यक्तींना रेल्वे भाड्यात सवलत मिळणार आहे. अशा लोकांना फर्स्ट आणि सेकंड क्लास एसीमध्ये 50 टक्के आणि इतर क्लासमध्ये 75 टक्क्यांपर्यंत सूट दिली जाणार आहे.
● दृष्टिहीन व्यक्तींना सवलत.
तर दृष्टिहीन व्यक्ती आणि त्याच्यासोबत असणाऱ्या व्यक्तीला राजधानी आणि शताब्दी ट्रेनच्या थर्ड एसी आणि चेअर्ड तिकिटांवर 25 टक्के सवलत असेल.
● मानसिकदृष्ट्या दिव्यांग व्यक्तींना सवलत.
मानसिकदृष्ट्या दिव्यांग व्यक्ती त्याच्यासोबत असणाऱ्या व्यक्तीला मासिक आणि त्रैमासिक पासवर 50 टक्के सवलत मिळणार आहे. अशीच सवलत मूकबधिर व्यक्ती आणि त्याच्यासोबत प्रवास करणाऱ्या व्यक्तीलाही मिळेल.
● कॅन्सर रुग्ण आणि एक नातेवाईक.
- कॅन्सर रुग्ण आणि त्यांच्यासोबत जाणाऱ्या एक नातेवाईक रेल्वेच्या तिकीट दरांत सूट देण्याची तरतूद आहे. ते कुठेही उपचारासाठी जात असतील तर त्यांना AC चेअर कारमध्ये 75 टक्के सूट मिळते. तसेच, AC-3 आणि स्लीपरमध्ये 100 टक्के सूट उपलब्ध आहे. तसेच, फर्स्ट क्लास, सेकंड एसी क्लासमध्ये 50 टक्के सूट उपलब्ध आहे.
● थॅलेसेमिया, हृदयरोगी, किडनी विकारांन ग्रस्त असलेला रुग्ण आणि सोबतचा एक नातेवाईक.
- थॅलेसेमिया, हृदयरोगी, किडनी रुग्णांनाही रेल्वेच्या तिकीट दरांत सवलत देण्यात येते. हृदयरोग असणारे रुग्ण, हृदय शस्त्रक्रियेसाठी जाणारे, मूत्रपिंडाचे रुग्ण मूत्रपिंड प्रत्यारोपण किंवा डायलिसिससाठी गेल्यास रेल्वेच्या तिकीट दरांत सूट देण्याची तरतूद आहे. या स्थितीत AC-3, AC चेअर कार, स्लीपर, सेकंड क्लास, फर्स्ट एसीमध्ये 75 टक्के सूट उपलब्ध आहे. यासोबतच रुग्णांसोबत येणाऱ्या व्यक्तीलाही सूट मिळते.
● हिमोफिलिया ग्रस्त असलेला रुग्ण आणि सोबतचा एक नातेवाईक.
- यासोबतच हिमोफिलियाच्या रुग्णांना उपचारासाठी जातानाही रेल्वेच्या तिकीट दरांत सवलत मिळते. या रुग्णांसोबत जाणाऱ्या एका व्यक्तीलाही रेल्वेच्या तिकीट दरांत सूट मिळते. या लोकांना सेकंड क्लास, स्लीपर, फर्स्ट क्लास, AC-3, AC चेअर कारमध्ये 75 टक्के सूट मिळते.
● टीबीच्या व्याधींनी ग्रस्त असलेला रुग्ण आणि एक नातेवाईक.
- टीबी रुग्णांना उपचारासाठी जाण्यासाठी रेल्वेच्या तिकीट दरांत सूट देण्याची तरतूद आहे. या रुग्णांना सेकंड, स्लीपर आणि फर्स्ट क्लासच्या तिकीट दरांमध्ये 75 टक्के सूट मिळते. तसेच, रुग्णासोबत जाणाऱ्या व्यक्तीला देखील रेल्वेच्या तिकीट दरांत सूट दिली जाते.
● यासोबतच कुष्ठरुग्ण, एड्स, ऑस्टॉमी, अँनिमियाच्या सवलत दिली जाते.
- संसर्ग नसलेल्या कुष्ठरुग्णांनाही सेकंड, स्लीपर आणि फर्स्ट क्लासमध्ये 75 टक्के सवलत दिली जाते.
- एड्सच्या रुग्णांना उपचारासाठी जाताना सेकंड क्लासच्या तिकीट दरांत 50 टक्के सवलत दिली जाते.
- ऑस्टॉमीच्या रूग्णांना प्रथम आणि सेकंड क्लासमधील मंथली सेशन आणि क्वाटर सेशनच्या तिकिटांमध्येही सवलत मिळते.
- तसेच, अँनिमियाच्या रुग्णांना स्लीपर, एसी चेअर कार, एसी-3 टायर आणि एसी-2 टायरमध्ये 50 टक्के सूट दिली जाते.
अधिकृत माहिती वाचण्यासाठी येते क्लिक कर!
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा