ग्राहक म्हणून तुमचे अधिकार तुम्हाला माहीती आहेत का?
मित्रांनो ग्राहक म्हणून तुमचे अधिकार तुम्हाला माहीती आहेत का?
नागरिकांना ग्राहक म्हणून आपले हक्क, अधिकार आणि त्यासोबतच आपल्या कर्तव्यांची माहिती नसल्यामुळे अनेकदा त्रास सहन
1. कोणत्याही हॉटेलमध्ये मोफत पाणी पिऊ शकता किंवा स्वच्छतागृहचा वापर करू शकता.
इंडियन सराईज अॅक्टनुसार तुम्ही कोणत्याही हॉटेलमध्ये जाऊन पाणी पिऊ शकता आणि त्यांचे स्वच्छतागृह वापरू शकता ते ही अगदी मोफत. पण तुम्ही त्या हॉटेलमध्ये काही घेतलं नाही तरी देखील या दोन सेवांचा वापर तुम्ही करू शकता.
2. जागो ग्राहक जागो! ही जाहिरात घराघरांत कशी पोहचली?
'जागो ग्राहक जागो' ही जाहिरात घराघरांत पोहचली आहे. ही जाहिरात दूरदर्शन आणि इतर वाहिन्यांवर यावी यासाठी ग्राहक चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी सरकारकडे शिफारस केली होती.
"जाहिरातीसाठी असणारी आर्थिक तरतूद वाढवण्यात यावी आणि एक मोहीम सुरू करण्यात यावी अशी शिफारस करण्यात आली होती. ती केंद्र सरकारनं मंजूर केली आहे."

"एमआरपीवर देखील किंमत कमी करता येऊ शकते हा संदेश घराघरांत याच मोहीमेमुळे पोहोचला होता."
3. सुटे पैसे नाहीत म्हणून दुकानदार तुम्हाला गोळ्या-चॉकलेट देऊ शकत नाही.
एक किंवा दोन रुपये सुटे नाहीत म्हणून बऱ्याचदा दुकानदार एक रुपयाच्या गोळ्या किंवा चॉकलेट देतात.
चलनाला दुसरी पर्यायी वस्तू देण्याचा अधिकार दुकानदारांना नाही. तसंच दुसरी गोष्ट म्हणजे आपण न मागता एखादी वस्तू आपल्याला विकणं हे ग्राहक कायद्याचं उल्लंघन आहे.
4. दिलेलं वचन न पाळल्यास कंपनीवर कारवाई होऊ शकते.
जाहिरातीमध्ये दिलेलं वचन न पाळल्यास तुम्ही कंपनीवर दावा तर ठोकू शकतातच, पण त्याचबरोबर त्या उत्पादनाची जाहिरात करणाऱ्या व्यक्तीवरही दावा करू शकता.
2015 साली एक प्रकरण खूप गाजलं होतं. जाहिरातीमध्ये दाखवल्याप्रमाणं आपण गोरं झालो नाही असं म्हणत एका युवकाने एका फेअरनेस क्रीम कंपनीवर दावा केला होता.
दिल्लीच्या ग्राहक हक्क न्यायालयात या दाव्यावर सुनावणी झाली. न्यायालयानं कंपनीला दंड ठोठावला आणि जाहिरातीचे प्रसारण बंद करावे असे आदेश दिले होते.
5. शैक्षणिक संस्थांनी गुणवत्तेचे निकष न पाळल्यास त्यांच्यावर कारवाई होऊ शकते.
100% प्लेसमेंटची जाहिरात दिली पण नोकरी मिळाली नाही तर विद्यार्थ्यांसमोर बिकट प्रश्न निर्माण होतो.
6. रुग्णालयाने हलगर्जीपणा केल्यास कारवाई होऊ शकते.
रुग्णालयाने केलेल्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचे नुकसान झाले तर रुग्णालयावर कारवाई होऊ शकते.
जर रुग्णालयानं काही सेवा देण्यासाठी पैसे स्वीकारले असतील तर त्या सेवा देण्यास ते बांधील आहेत.
जर त्यांची पूर्तता त्यांनी केली नाही तर त्यांच्यावर कारवाई होऊ शकते.
7. चित्रपटगृहांमध्ये खाद्यपदार्थ नेण्यास बंदी नाही
चित्रपटगृहामध्ये घरी तयार केलेले खाद्यपदार्थ, पाणी घेऊन जाण्यास प्रतिबंध नाही.
खाद्यपदार्थ घेऊन जाण्यास मज्जाव करणं कायद्यानं गैर आहे, असं ग्राहक चळवळीतल्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे.
जर एखादं चित्रपटगृह खाद्यपदार्थ घेऊन जाण्यास बंदी घालत असेल तर नागरिकांनी यासंदर्भात तक्रार करावी, असं आवाहन ग्राहक चळवळीकडून केलं जातं.
८. पेट्रोल पंपावर मोफत मिळणाऱ्या सुविधा.
प्रत्येक पेट्रोल पंपावर सामान्य लोकांना 'या' सुविधा मोफत देणे बंधनकारक आहे. जर त्याने असे नाही केले, तर आपण त्याबद्दल तक्रार करू शकतो. या तक्रारी नंतर पेट्रोल पंपाचे लायसन्स रद्द होऊ शकतं आणि दंडही भरावा लागतो.
१) टायरमध्ये हवा भरण्याची सुविधा मोफत मिळते.
२) पेट्रोल पंपावर पिण्याच्या पाण्याची सुविधा ही मोफत असते.
३) पेट्रोल पंपावर वॉशरूमची सुविधा देखील मोफत केलेली जाते, जर वॉशरूम तुटलेले फुटलेले किंवा अस्वच्छ असेल तर आपण तक्रार करू शकतो.
४) पेट्रोल पंपावरती सामान्य जनतेसाठी फोन कॉलची सुविधा मोफत असणे आवश्यक आहे, तत्काळ कॉल करायचा असेल आणि नेटवर्क अडचण किंवा काही कारणास्तव फोन लागत नसेल तर या मोफत फोन सुविधेचा वापर सामान्य जनता करू शकते.
५) पेट्रोल पंपावरती प्रथमोपचार साहित्य उपलब्ध असणे आवश्यक आहे, कधीही एखादा अपघात होऊ शकतो, त्यात हे साहित्य उपयोगी येते.
६) पेट्रोल पंपावरती फायर सेफ्टी डिवाइसेस असणे खूप महत्वाचे आहे. पेट्रोल पंपावरती आग लागण्याची शक्यता खूप जास्त असते, त्यासाठी फायर सेफ्टी डिवाइसेस सगळ्या पेट्रोल पंपावर असणे गरजेचे आहे.
७) ज्या पेट्रोल पंपावर आपण पेट्रोल भरतो तिथून बिल घेणे हा आपला अधिकार आहे. जर तेथील कर्मचारी आपणाला बिल देण्यास नकार देत असतील तर त्याची तक्रार नोंदवणे गरजेचे आहे.
८) सर्व ग्राहकांना पेट्रोलची/डिझेलची क्वालिटी(शुद्धता) और क्वांटिटी(माप) जाणून घेण्याचा पूर्ण अधिकार आहे.
9) पेट्रोल पंपामध्ये पेट्रोल आणि डिझेल यांच्या किंमती डिस्पलेवर दर्शवणे गरजेचे आहे.
१०) प्रत्येक पेट्रोलपंपावर तक्रार पेटी असायला हवी.
११) पेट्रोल पंपावर मालक आणि पेट्रोलीयम कंपनीचे नाव आणि कॉन्टॅक्ट नंबर देणे गरजेचे आहे.
१२) प्रत्येक पेट्रोल पंपावरती पेट्रोल पंप सुरू होण्याचा आणि बंद होण्याची वेळ दर्शवणे आवश्यक आहे.
१३) महाराष्ट्र वैध मापनशास्त्र (अंमलबजावणी) नियम २०११ मधील तरतुदींनुसार पेट्रोलियम पदार्थांच्या अचूक वितरणाची खात्री करण्यासाठी प्रत्येक पंपावर पाच लीटर क्षमतेचे प्रमाणित माप ठेवणे बंधनकारक आहे.
टीप: वरील सर्व छायाचित्र प्रतिनिधीक स्वरूपाची आहेत.
-----------------------------------------------------------------------------------
तक्रार कुठे करावी?
जर पेट्रोल पंपावर यापैकी कुठलीही सुविधा मोफत दिली नाही तर आपण पेट्रोल पंपाच्या मालकाविरुद्ध तक्रार करू शकता.
१. जर आपणास या सुविधा मिळाल्या नाही, तर सर्वप्रथम आपण तेथे तक्रार बुक घेऊन त्यात आपली तक्रार नोंदवावी.
२. तसेच पेट्रोल पंप ज्या कंपनीचा आहे, त्या कंपनीच्या संकेतस्थळावर ऑनलाईन तक्रार करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
३. शिवाय भारत सरकारच्या पेट्रोलियम मंत्रालयाच्या संकेतस्थळावर सुद्धा तक्रार करता येते.
४. प्रत्येक पेट्रोल पंपावर किंवा कोणत्याही दुकानांमध्ये वजन मापात किंवा छापील किमतीमध्ये तफावत आढळल्यास वैधमापन शास्त्र विभागाकडेही तक्रार करता येते.
५. ही तक्रार सेंट्रलाइज्ड पब्लिक ग्रीवेंस रिड्रेस एंड मॉनिटरिंग सिस्टम या पोर्टलवर जाऊन करू शकतो.
Centralized Public Grievance Redress And Monitoring System (CPGRAMS)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा