एसटी प्रवाशांना मिळणाऱ्या सोयी सुविधा, अधिकार आणि तक्रार कशी करावी

एसटी प्रवाशांना मिळणाऱ्या सोयी सुविधा, अधिकार आणि तक्रार कशी करावी!


एसटी ग्राहक सजग व्हा, सतर्क व्हा, आपल्याला मिळणाऱ्या सुविधा मिळत नसतील तर कशा मिळवायच्या ते पहा!

महाराष्ट्रात बऱ्या पैकी सर्व एसटी अगारात सुलभ शौचालय आहे. सदर शौचालय स्वच्छ राहावे त्यात पाणी मिळावे, त्याची देखभाल व्हावी म्हणून सरकारने सदर सौचालाये ही सुलभ इंटरनॅशन किंवा इतर लोकांना चालवणे साठी दिली आहेत. एस टी स्टँड वरील सदर टॉयलेट स्वच्छ ठेवणे त्यात दिवा बत्ती असणे, लाईट बिल देणे, त्यात पाणी पुरवठा करून लोकांना सुविधा देणे यासाठी त्यांच्याशी एस टी आगर हे  करारनामा करतात.

शिवाय ग्राहक हा प्रत्येक वेळी सदर सेवा पैसे देऊन विकत घेतो. तेव्हा ग्राहकाचे काही हक्क आणि अधिकार आहेत हे ग्राहक विसरतो. एस टी स्टँड वरील टॉयलेट मध्ये लाईट नाही, पाणी नाही किंवा तेथे स्वच्छ्ता नाही असे आढळले तर योग्य ठिकाणी दाद मागितली पाहिजे. परंतु ग्राहक हा मुकाट्याने सदर ठिकाणी सौचालय वापरतो, ते स्वच्छ नसेल तर वापरत नाही. त्यात महिलांना याचा खूप त्रास होतो. कारण महिलांना टॉयलेट वापरणे साठी मिळाले नाही तर त्यांना खूप त्रास होऊ शकतो. वेळेवर टॉयलेट ला गेले नाही तर नाना मूत्र विकार होतात, त्याचा परिणाम म्हणून इतर आजार जडतात. युरिन इन्फेक्शन मुळे कित्येक महिलांना, पुरुषांना खूप त्रास होतो. सदर इन्फेक्शन हे अस्वच्छ टॉयलेट मुळे होते. 

केंद्र सरकारने तसेच राज्य सरकारने याबाबत खूप चांगले धोरण अवलंबले आहे. त्यासाठी काही मोबदला घेऊन सुलभ इंटरनॅशन किंवा तत्सम कंपनी कडे ही टॉयलेट्स देखभाल करणे साठी करारनामा करून दिलेली आहेत. तसेच सदर काम योग्य रीतीने होते आहे की नाही याची पाहणी करणे आणि त्यावर अंमलबजावणी करणे साठी कंट्रोलर, अगार प्रमुख यांना अधिकार दिलेले आहेत. 

परंतु सदर अधिकारी, कर्मचारी वर्ग हा उदासीन असतो आणि त्यांना स्वतःला त्यात जावे लागत नाही म्हणून ते बेफिकीर असतात, जाणून बुजून त्याकडे दुर्लक्ष करतात त्याची अजून काही वेगळी कारणे असू शकतात. परंतु ग्राहक म्हणून आपण सतर्क राहिलो तर नक्कीच आपण ही परिस्थिती, वस्तुस्थिती बदलू शकतो. नुकतेच इस्लामपूर, सांगली येथील अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे सांगली जिल्हा टीम ने व्यवस्थापक, सुलभ शौचालय इस्लामपूर यांना तसेच नाथजल या जादा दराने पाणी विक्री करणाऱ्या ना दंड करणे साठी एस टी महामंडळ यांना भाग पाडले आहे. तेव्हा तुम्हीही गप्प बसू नका. 

रा.प.म. आगार इस्लामपूर जिल्हा सांगली, येथे प्रवासी ग्राहकांची आर्थिक लूट सुरू होती. याबाबत अखिल भारतीय ग्राहक पंचायत सांगली जिल्हा यांनी, श्री अक्षय पाटील, जिल्हा प्रवासी समिती प्रमुख, यांचे सोबत सर्व्हे करून आगार व्यवस्थापक, यांच्याकडे ऑनलाईन तक्रार दिली होती ती अशी, 

इस्लामपूर आगार या ठिकाणी भेट दिली असता आपल्या आगारामध्ये टॉयलेट सुविधेचा दर नियमानुसार दोन रुपये आहे व इस्लामपूर आगारांमध्ये दहा रुपये घेत आहेत. 

याचे सर्व स्टिंग ऑपरेशनचे व्हिडिओ तयार करून जोडले. तसेच या ठिकाणी असणारे नाथ जल पिण्याचे पाणी एक लिटर बाटली MRP 15 आहे व येथील सर्व ठिकाणी वीस रुपये घेत आहेत पावती मागितली असता पावती देत नाहीत.

आगारांमध्ये पोलीस कॉन्स्टेबल स्टिंग ऑपरेशन केलं त्यावेळेस उपलब्ध नव्हते या सर्व प्रकाराची नोंद एस टी आगारातील तक्रार पुस्तकांमध्ये केली आहे. तरी या सर्वांची दखल घेऊन संबंधित ठेकेदारांच्यावर योग्य ती कारवाई करावी असे कळवले होते. 

तसेच 1 लिटर पाणी व अर्धा लिटर पाणी याचे 30 रुपये बिल घेतले आहे यांनी बिल पावती दिली नाही म्हणून ऑनलाइन बिल पे केले आणि त्याची प्रिंट तक्रारी सोबत जोडली.  

यासाठी श्री अक्षय पाटील, 

सांगली जिल्हा प्रवासी समिती  प्रमुख, येडेनिपाणी,  तालुकावाळवा, जिल्हा सांगली (Mo 9730221765.) यांनी स्वतः पुढाकार घेतला आणि ईमेल द्वारे तक्रार दाखल केली. 

त्यावर सांगली विभाग कंट्रोलर, एम एस आर टी सी यांनी तात्काळ कारवाई करून सुलभ सौचालय यांना ५०० रुपये दंड आकारला. नाथजल विक्री करणाऱ्याला योग्य सूचना करून पिण्याच्या एक लिटर पाण्याची बाटली १५ रुपये आणि अर्धा लिटर पाण्याची बाटली ९ रुपये या एम आर पी दराने विक्री करणेसाठी आदेश दिले.

अखिल भारतीय ग्राहक पंचायत ने इथेच न थांबता वजन माप अधिकारी यांच्या कडे तक्रार केली आहे आणि सदर जास्त दराने पाणी बॉटल विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कायदेशीर कारवाई करणे साठी तक्रार करणेचे ठरवले आहे.

तेव्हा एस टी ग्राहक राजा जागा हो. सुविधा मिळत नसतील तर तक्रार कर, पुरावा म्हणून  स्वतःच्या हातातील स्मार्ट फोन चा वापर कर, फेसबुक लाईव्ह, व्हिडिओ रेकॉर्डिंग इत्यादी करून त्याच फोन ने संबंधित लोकांना ईमेल करून अधिकार मिळवा!

चला तर मग आपण आता स्वतःच सर्व गोष्टी करूयात आणि महाराष्ट्रातील एस टी स्टँड सुधारूयात. टॉयलेट स्वच्छ ठेवणे आणि योग्य पैसे आकारणे, एस टी स्टँड तसेच इतरत्र मिळणाऱ्या पाण्याच्या बाटल्या, कॉल्ड ड्रिंक्स, दूध एमआरपी पेक्षा जास्त पैसे देऊन विकत घेणार नाही आणि कोणी विकलेच तर त्याला धडा शिकवूयात. 

एका सजग ग्राहकाने नाशिक रोड येथील एस टी स्टँड वर नाथ जलची विक्री छापील किंमतीपेक्षा जादा दराने केली आणि ग्राहकांशी असभ्य वागले याचा व्हिडिओ सोशल मीडिया वर टाकला त्यामुळे एस टी महामंडळाने सदर नाशिक रोड स्टँड वरील नाथजल ला नोटीस देऊन ५०,००० रुपये दंड केला आहे.















अशाचप्रकारे जागरूक तरुण अक्षय भूमकर यांनी स्वारगेट बसस्थानक परिसरात पिण्याचे पाणी जादा दराने विकले जात असल्याबाबत ऑनलाईन ईमेलद्वारे तक्रार केलेली होती.


















अक्षय भूमकर यांच्या तक्रारीची दखल घेऊन तत्काळ कारवाई करण्यात आल्याचे सोबत पत्र आहे.










अक्षय भूमकर यांनी तक्रार केल्यानंतर त्याची दखल घेऊन रुपये १५००/- इतका दंड सबंधित दुकानदाराला तत्काळ लावण्यात आला.








तेव्हा ग्राहक राजा जागा हो.

एस टी संबंधित इमेल आपल्या माहिती साठी खालील प्रमाणे.

१) msrtchelpdesk@gmail.com

२) Chairmanmsrtc@gmail.com 

३) acs.transport@maharastra.gov.in 

वजन माप अधिकारी यांच्याकडे तक्रार करणे साठी खालील लिंक वापरा. 

https://www.vaidhmapan.maharashtra.gov.in/LMD/Complaint/ComplainEntry.aspx?ComplaintType=ComplaintRegistration?









न्याय जरा उशिरा मिळाला तरी देखील चिकाटी सोडू नये. आपल्याला कोणत्याही बाबतीत तक्रार कशी करायची यासाठी मार्गदर्शन हवे असेल तर अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे आपल्या जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना संपर्क करून मार्गदर्शन घेऊ शकता ते ही अगदी मोफत.

अशाप्रकारे जनता जागरूक होऊ लागली, त्यातच ३० रुपयांमध्ये एसटी प्रवाशांना चहा नाश्ता देण्याबाबतची एक जुनी २०१६ ची एसटी महामंडळाची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली.





हीच ती जुनी 2016 ची पोस्ट.






त्याची दखल एसटी महामंडळाला नव्याने घ्यावी लागली व त्यांनी, सुधारित परिपत्रक दिनांक २५ मे २०२३ रोजी काढले आहे.








विजय सागर,

केंद्रीय कार्यकारिणी सदस्य,

अखिल भारतीय ग्राहक पंचायत, ६३४, सदाशिव पेठ, पुणे ३०

आमची वेबसाईट : www.abgpindia.com

मोफत मार्गदर्शन हेतू संपर्क करा: 

दर सोमवार, बुधवार, शुक्रवार सायंकाळी ६ ते ७.३०,
अखिल भारतीय ग्राहक पंचायत ६३४, सदाशिव पेठ, पुणे ४११०३०.

अधिक माहितीसाठी संपर्क

विजय सागर 9422502315
श्री विलास लेले 9823132172
सौ अंजली देशमुख 9823135803
श्रीमती विजया वाघ 9075132920
श्री रवींद्र वाटवे 9422383785
श्रीमती राजश्री दीक्षित 9422318909
श्री रवींद्र सिन्हा, बाणेर 7774001188
श्री विश्वास चव्हाण,धानोरी 7769978484
श्री अरुण नायर,विश्रांतवाडी 9890652675

ठाणे- श्रीमती स्मिता जामदार 9819438286,
श्री दिपक सावंत 9833398012
डोंबिवली- श्री राजेंद्र बंडगर 9975712153
नागपूर- श्री विलास ठोसर 7757009977
कोकण प्रांत- सौ वेदा प्रभूदेसाई 9075674971

देवगिरी परभणी- श्री विलास मोरे 09881587087
कोल्हापूर- ऍड.सुप्रिया दळवी, मो.7038887979
सांगली- श्री.सर्जेराव सूर्यवंशी, मो.9763722243
सातारा- श्री जयदीप ठुसे, 9767666346
सोलापूर- श्री.शशिकांत हरिदास, मो.9423536395

जळगांव- डॉ. अनिल देशमुख, मो.7588011327
नगर- श्री. अतुल कुऱ्हाडे, मो.9420642021
नाशिक- श्री. तुळशीराम सांळुके, मो. 9422259089
श्री. रविंद्र अमृतकर, मो. 8412995454
धुळे- श्री. हरीश जाधव, मो. 7798439555
नंदुरबार- श्रीम.वदंना तोरवणे,मो .9156972786

मित्रांनो, जागरूक नागरिक होऊन समाजातील अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार, कमी करणे आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे त्यासाठी, वाचन, चिंतन, मनन, सकारात्मक चर्चा आवश्यक आहे.

अशीच नवनवीन माहिती वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम, वेबसाईट या सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॉटफॉर्मवर अवश्य फॉलो करा.

Follow us on,

फेसबुक- 

वेबसाईट-

फेसबुक ग्रुप- 

टेलिग्राम- 

इंस्टाग्राम-@jagruk_houyat. 

फेसबुक पेज -


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वीज ग्राहकांचे अधिकार! ग्राहकांनी तक्रार कुठे करावी!

कागदपत्रे नोटरी करणेसाठी जाता तेव्हा किती फी देता? त्याची पावती घेता का? नोटरी बोगस तर नाही ना?

माहितीचा अधिकार कायदा 2005 (RTI-Right to Information Act 2005) म्हणजे काय?