कर्जाचे हप्ते दिले नाही म्हणून बँक/फायनान्स कंपनी गाड्या ओढून नेऊ शकत नाही, टीव्ही घरातून उचलून घेऊ शकत नाही

कर्जाचे हप्ते दिले नाही म्हणून बँक/फायनान्स कंपनी गाड्या ओढून नेऊ शकत नाही, टीव्ही घरातून उचलून घेऊ शकत नाही. आज मितीस चार चाकी गाडी खरेदी असो, दोन चाकी गाडी खरेदी असो, घरात मोठ्या वस्तू जसे टीव्ही, फ्रिज इत्यादी. लोक फायनान्स कंपनी कडून कर्ज घेऊन कधी ० रुपये डाऊन पेमेंट ने तर कधी १०% रक्कम भरून कर्ज काढून घेतात. त्यासाठी त्यांना आपल्या गाडीवर आरटीओ मध्ये हायपोथिकेशन (कर्ज देणाऱ्याचे नाव) ची नोंद घालून ठेवावी लागते. बँक आणि फायनान्स कंपनी कडून गाडी घेणे साठी, घरातील वस्तू घेणे साठी घेतलेले कर्ज ग्राहकांनी महिन्याला ठराविक ई एम आय द्वारे परत भरावे असे ग्राहक आणि फायनान्स कंपनी मधील करारात नमूद असते. अखिल भारतीय ग्राहक पंचायत मध्ये बरेच ग्राहक येतात की त्यांना कोविड मुळे किंवा इतर कारणाने पगार वेळेवर मिळत नाही त्यामुळे एक दोन महिने हप्ते भरले नाहीत म्हणून गाडी/टीव्ही फायनान्स कंपनीने ओढून नेली आहे असे सांगतात. त्यावर काय करावे असा सल्ला विचारला जातो. वास्तविक, हायर-परचेस करारांतर्गत जेव्हा कर्जाच्या पेमेंटमध्ये डिफॉल्ट असते तेव्हा ग्राहकाला दंडात्मक खर्चाचा सामना करावा ल...