ग्राहक म्हणून तुमचे अधिकार तुम्हाला माहीती आहेत का?

मित्रांनो ग्राहक म्हणून तुमचे अधिकार तुम्हाला माहीती आहेत का? नागरिकांना ग्राहक म्हणून आपले हक्क, अधिकार आणि त्यासोबतच आपल्या कर्तव्यांची माहिती नसल्यामुळे अनेकदा त्रास सहन करावा लागल्याची अनेक उदाहरणे आहेत. 1. कोणत्याही हॉटेलमध्ये मोफत पाणी पिऊ शकता किंवा स्वच्छतागृहचा वापर करू शकता. इंडियन सराईज अॅक्टनुसार तुम्ही कोणत्याही हॉटेलमध्ये जाऊन पाणी पिऊ शकता आणि त्यांचे स्वच्छतागृह वापरू शकता ते ही अगदी मोफत. पण तुम्ही त्या हॉटेलमध्ये काही घेतलं नाही तरी देखील या दोन सेवांचा वापर तुम्ही करू शकता. 2. जागो ग्राहक जागो! ही जाहिरात घराघरांत कशी पोहचली? 'जागो ग्राहक जागो' ही जाहिरात घराघरांत पोहचली आहे. ही जाहिरात दूरदर्शन आणि इतर वाहिन्यांवर यावी यासाठी ग्राहक चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी सरकारकडे शिफारस केली होती. "जाहिरातीसाठी असणारी आर्थिक तरतूद वाढवण्यात यावी आणि एक मोहीम सुरू करण्यात यावी अशी शिफारस करण्यात आली होती. ती केंद्र सरकारनं मंजूर केली आहे." "एमआरपीवर देखील किंमत कमी करता येऊ शकते हा संदेश घराघरांत याच मोहीमेमुळे पोहोचला होता." 3. सु...