वित्त विभागाने बाह्य यंत्रेणेद्वारे कामे करून घेण्यासाठी नऊ कंपन्या / संस्थेबरोबर (ठेकेदारामार्फत) करार केला असल्याचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून अति कुशल, कुशल, अर्ध कुशल, अकुशल इत्यादी तत्सम मनुष्यबळ पुरवठा सेवा पुरवताना खालील अटी शर्ती, सूचनांचे पालन व त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे बाबत.


प्रति,
माननीय मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य 
वित्त विभाग, महाराष्ट्र शासन 
सामान्य प्रशासन विभाग, महाराष्ट्र शासन
कामगार विभाग, महाराष्ट्र शासन
गृह विभाग, महाराष्ट्र शासन

विषय : वित्त विभागाने बाह्य यंत्रेणेद्वारे कामे करून घेण्यासाठी नऊ कंपन्या / संस्थेबरोबर (ठेकेदारामार्फत) करार केला असल्याचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून अति कुशल, कुशल, अर्ध कुशल, अकुशल इत्यादी तत्सम मनुष्यबळ पुरवठा सेवा पुरवताना खालील अटी शर्ती, सूचनांचे पालन व त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे बाबत.

सस्नेह जय महाराष्ट्र,

महोदय / महोदया,

शासनाच्या वित्त विभागाने नुकतेच परिपत्रक काढले असून, याबाबत कशा पद्धतीने कार्यवाही करावी हे स्पष्ट केले आहे. राज्य सरकारने बाह्ययंत्रणेकडून कामे करुन घेण्यासाठी नऊ सेवा पुरवठादार संस्थांची नियुक्ती केली आहे. त्यांच्याकडून अतिकुशल, कुशल, अर्धकुशल व अकुशल मनुष्यबळाचा पुरवठा करण्यात येणार आहे.

वित्त विभागाच्या संबंधित परिपत्रकासंबंधीत विषयाच्या अनुषंगाने खालील नमूद अटी शर्तींचा सूचनांचा विचार करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे बाबत संबंधित विभाग यांचेकडून तातडीने कार्यवाही करण्यात यावी, व त्याबाबत निवेदनकर्त्यास लेखी तपशिलासह कळविण्यात यावे.

१) महाराष्ट्र राज्यातील पत्त्याचे आधारकार्ड अनिवार्य
२) महाराष्ट्र राज्यातील पत्त्याची शिधापत्रिका अनिवार्य
३) पत्त्याचा पुरावा : महाराष्ट्र राज्यातील पत्त्याचे मतदान ओळखपत्र, पारपत्र, वाहन चालक अनुज्ञप्ती, मालमत्ता / पाणीपट्टी पावती अनिवार्य
४) महाराष्ट्र गृह विभाग यांचेकडील चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र अनिवार्य
५) रहिवासी दाखला अनिवार्य
६) महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभाग यांचे कडील इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंत मराठी भाषेत शिक्षण घेतल्याचा दाखला / प्रमाणपत्र, गुणपत्रिका इत्यादी अनिवार्य
७) विहीत करार मुदत संपल्यानंतरही वेळोवेळी नवीन करार करत असताना वरील सूचना क्रमांक एक ते सहा नियम बंधनकारक करण्यात यावेत.



सोबत वित्त विभागाचे संबंधित परिपत्रक जोडले आहे.
धन्यवाद!

हितचिंतक,
श्री.आनंदा मारुती पाटील
उपाध्यक्ष,
मराठी एकीकरण समिती, महाराष्ट्र राज्य
३०६, श्रीजी इमारत, दिवा शिळ मार्ग,
वैभव ढाब्याचा मागे, आदर्श गुरुकुल शाळेसमोर, दिवा (पूर्व), जिल्हा : ठाणे ४००६१२.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वीज ग्राहकांचे अधिकार! ग्राहकांनी तक्रार कुठे करावी!

कागदपत्रे नोटरी करणेसाठी जाता तेव्हा किती फी देता? त्याची पावती घेता का? नोटरी बोगस तर नाही ना?

माहितीचा अधिकार कायदा 2005 (RTI-Right to Information Act 2005) म्हणजे काय?