लाच केव्हा मागितली जाते, अवैध, बेकायदेशीर धंद्यांसाठी कशाप्रकारे हप्ते, लाच मागितले जातात याची माहिती घेऊयात.


मित्रांनो कोणकोणत्या अवैध, बेकायदेशीर धंद्यांसाठी कशाप्रकारे हप्ते/लाच मागितले जातात याची माहिती पुढीलप्रमाणे घेऊयात.

भ्रष्टाचार म्हणजे यंत्रणेला लागलेला महाभयंकर असा रोग आहे.असा रोग देशाच्या अर्थव्यवस्थेला खिळखिळा करू शकतो. भ्रष्टाचार म्हणजे गुन्हेगारी किंवा अप्रामाणिकपणाचा एक प्रकार आहे. अनेक कामे पूर्णत्वास येत नाहीत व रखडली जातात. भ्रष्टाचार उद्भवण्याची प्रमुख कारणे म्हणजे पैशासाठी चा हव्यास किंवा झटपट पैसे कमावण्याची लालसा आहे. तसेच, भ्रष्टाचार विविध मार्गांनी होऊ शकतो. बहुधा, अधिकार पदावरील लोक भ्रष्टाचाराला बळी पडतात. भ्रष्टाचार हा नक्कीच लोभी आणि स्वार्थी वर्तन प्रतिबिंबित करतो.
▪️गृह विभाग व पोलिस विभागातील भष्टाचार प्रकरणी
संबंधित लोकसेवकाने खालील प्रकारच्या वेगवेगळ्या मार्गाने महाराष्ट्रात शासकिय कार्यवाही करताना भष्टाचार केल्याचे / हप्ता घेतल्याचे आढळून येत आहे.

१) घरगुती गॅस सिलिंडरचा काळाबाजार करतो म्हणून.
२) बनावट डिझेल काळाबाजार करतो म्हणून
३) मटकाच्या धंदा चालवतो म्हणून.
४) जुगारचा धंदा  चालवतो म्हणून.
५) गुटखा विक्री करणतो म्हणून.
६) बेकायदेशीर वाळु उपसा करतो म्हणून.
७) बेकायदेशीर इंग्रजी दारू विकनतो म्हणून.
८) गाई म्हशी चे कत्तलखाने चालवतो म्हणून.
९) गावठी बनावटी ची दारू विकणतो म्हणून.
१०) गावठी बनावटी ची दारू तयार करून विकतो म्हणून.
११) अवैध प्रवासी वाहतूक करता म्हणून.
१२) टु व्हिलर आणि फोर व्हीलर गाड्या अडवून दंडात्मक 
रक्कमेच्या नावाखाली दुसरी वसुली.
१३) गांजाची किरकोळ विक्री करतो म्हणून.
१४) बेकायदेशीर बिअर बार चालवतो म्हणून.
१५) डान्स बार चालवतो म्हणून.
१६) अर्केस्ट्रा बार चालवतो म्हणून.
१७) लाॅज च्या नावाखाली वेश्या व्यावसाय  करतो म्हणुन.
१८) कुठनं खाणा चालवणे.
१९) ड्रग्ज, हिराॅइन विकता म्हणून.
२०) कोणत्याही परीसरात भीक मागणाऱ्या व्यक्तीला रोज भिक मागण्यांसाठी  म्हणून.
२१) आरोपीचा जामीन करण्यासाठी मदत करतो.
२२) खोटा गुन्हा दाखल करून अडकतो म्हणून.
२३) अवजड वाहनांमध्ये शासनाच्या परवानगी पेक्षा ज्यादा लोड भरणे म्हणून.
२४) आरोपी ला जेलमध्ये त्रास किंवा मारत नाही म्हणून.
२५) दोन्ही पक्षाला दाब देऊन केस दाखल न होता मिटवणे म्हणून.
२६) पोलिस कस्टडी मधुन जज च्या कस्टडी मध्ये जाण्याकरीता मदत करतो म्हणून.
२७) मा.उच्य न्यायालयात आरोपीचा जामीन अर्ज दाखल आहे. न्यायालयात म्हणने आरोपी च्या बाजुने सादर करतो म्हणून.
२८) आरोपीला नातेवाईक किंवा मित्राला फोनवर किंवा समोर भेटण्यासाठी मदत करतो म्हणून.
२९) आरोपी नें गुन्हा केला असुन सुद्धा गुन्हा दाखल न करण्याकरिता म्हणून.
३०) चोरीच्या गुन्ह्यातील ,सोने ,चांदी,इतर वस्तू कमी करणे म्हणजे १० तोळे सोने चोरीला गेले असताना चोरा बरोबर हेराफेरी करुन ४ तोळे सापडले असे दाखवने म्हणून.
३१) गुन्हातील वाहण न्यायालयातुन सोडवण्यासाठी मदत करत़ो म्हणून.
३२) रेशन मालाचा काळाबाजार करतो म्हणून.
३३) अवैध सावकारी धंदा म्हणून.
३४) पेट्रोल पंपावरून कॅडमधुन पेट्रोल विकत घेऊन खेडोपाडी नेऊन विकायचा धंदा म्हणून.
३५) लोकनाट्य कलाकेंद्र चालवतो म्हणून.
३६) तमाश्या थेटर चालवतो म्हणून.
३७) फायनान्स च्या नावाखाली अवैध सावकारी करतो म्हणून.
३८) एस टी स्टँड परीसरात वेश्याव्यवसाय करतात म्हणून.
३९) रेल्वे स्थानकाच्या परीसरात वेश्याव्यवसाय करतात म्हणून.
४०) चंदन तस्करी करतात म्हणून.
४१) हुक्का पार्लर चालवतो म्हणून.
४२) ज्युस सेंटर च्या नावाखाली बेकायदेशीर धंदे चालवतो म्हणून.
४३) पब चालवतो म्हणून.
४४) घरगुती वेश्याव्यवसाय करतात म्हणून.
४५) सरकारी जागेतील बेकायदेशीर रित्या मुरूम उपसा करतात म्हणून.
४६) भंगार चा धंदा करतात म्हणून.
४७) मसाज पार्लर चा धंदा करतात म्हणून.
४८) हाॅटेल्स, काॅर्पोरेट कंपन्यांचे बेकायदा पार्किंगसाठी – दरमहा 40 ते 50 हजार.
४९) काॅर्पोरेट कंपन्यांचे रस्ते खोदकाम – 50 हजार ते 1 लाख.
५०) चित्रीकरणासाठी -50 ते 1 लाख
५१) नेस्को, बीकेसीतील मोठ्या आयोजनासाठी -1 लाख
५२) बेकायदेशीर रिक्षा टॅक्सी चालक – दरमहा 1 ते 2 हजार रुपये
५३) डाॅमिनोज, मॅकडोनल्ड, पिझ्झा हटकडून -20 ते 25 हजार
५४) दुचाकी शोरुम चालवतो म्हणून -5 हजार
५५) चारचाकी शोरुम चालवतो म्हणून  – 10 हजार
५६) पाण्याचे टॅंकर चालवतो म्हणून - दिवसाला -100 ते 200 रुपये
५७) बांधकाम प्रकल्प चालू  आहे म्हणून -25 चे 30हजार
५८) ओव्हर लोडिंग ट्रक मालकाकडून हप्ता -दिवसाला 3 ते 4 हजार
५९) बेकायदा विद्यार्थी व्हॅन कडुन -1 ते 2 हजार
६०) खोटे ऑट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करून नाहक निष्पक्ष लोकांना त्रास देऊन पैसे घेणे.
६१) महिलांना हाताला धरून, महिलांचा वापर करून, विनयभंगासारखे खोटे गुन्हे दाखल करून पैसे घेणे.
६२) गुन्ह्यातील आरोपी व इतर नातेवाईका विरूद्ध  प्रतिबंधक कारवाई न करण्याकरिता.
६३) गुन्ह्यातील आरोपीस कोर्टात हजर करून जामीन मंजूर करून देण्यासाठी.
६४) आरोपीचे जामीनकिचे वाॅरटची माहिती देण्याकरीता.
६५) गुन्हा मध्ये इतर नातेवाईकाना गुंतवतो म्हणून.
६६) तक्रार अर्ज वरून गैर अर्जदार यांचे विरूद्ध कारवाही न करण्याकरिता.
६७) गुन्हा तील वाहनं किंवा किंमती वस्तू जप्त न करण्याकरिता.
६८)वाहन अपघातामध्ये इन्शुरन्स क्लेम साठी स्टेशन डायरीचा उत्तारा देण्याकरीता.
६८) पोलिसांनी अटकाव केलेल्या वाहनांची चावी किंवा लायसन्स परत देण्याकरीता.
६९) गुन्हाचा तपास पुर्ण करुन दोषारोप पत्र कोर्टात दाखल करेपर्यंत आरोपीस मदत करण्यासाठी.
७०) पासपोर्ट पडताळणी अहवाल कार्यालय मार्फत न पाठविता स्वतः अहवाल घेऊन संबंधित कार्यालयात दाखल करून त्याचे बक्षीस म्हणून.
७१) दाखल गुन्हात तपासात सहकार्य करून त्याचे बाजुने निर्णय देण्याकरीता
७२) दाखल गुन्हाचे प्रकरण मिटविण्यासाठी.
७३) कोर्टात दाखल केलेली केस मागे घेण्याकरिता तडजोड करुन त्यांना भरपाई देण्याच्या बहाण्याने .
७४) लोकल ट्रेन मध्ये फेरीचा धंदा करतो म्हणून
७५) समन्स ची माहिती देण्याकरीता..
७६) खोटा गुन्हा दाखल करून त्यामध्ये अटक करण्याची बतावणी करून.
७७) गुन्ह्यांच्या तपासात पैश्याची आवश्यकता आहे असे सांगून .
७८) रिक्षा चालवण्याचा हप्ता दिला नाही म्हणून सदर रिक्षा दुरक्षेत्रात जमा करून ठेवण्याबाबत.
७९) गॅरेज वर व हाँटेलवर कारवाही न करण्याकरिता.
८०) ट्रान्सपोर्टचा व्यावसाय असलेल्या टॢकमधुन अवैध रित्या धान्यांची वाहतूक करतात असे सांगून अडवून ठेवलेला  टॢक सोडवण्यकरिता .
८१) आकड्यांची बुकींग चालवतो म्हणून.
८२) व्हिडिओ गेम चालवतो म्हणून.
८३) पब चालवतो म्हणून.
८४) गांजाची तस्करी करतो म्हणून.
८५) झाडांची कत्तल/ तोडुन लाकडे विकतो म्हणून.
८६) मा उच्च न्यायालयात जामीन मंजूर करून घेण्यासाठी आरोपीच्या बाजुने म्हणने सादर करतो म्हणून.
८७) गुन्ह्यातील साक्षीदार यांना सांगुन कोर्टासमोर आरोपीच्या बाजुने म्हणने देण्यास सांगतो म्हणून.
८८) तक्रारा कडुन गुन्हा दाखल करून घेण्यासाठी म्हणून.
८९)मा सत्र न्यायालयात जामीन मंजूर करून घेण्यासाठी आरोपीच्या बाजुने म्हणने सादर करतो म्हणून.
९०) आँनलाईन लाॅटरीचा धंदा करतो म्हणून.
९१) फुटपाथ वर किरकोळ विक्री करतात म्हणून.
९२) पोलिस स्टेशनच्या जेल मध्ये असलेल्या आरोपीला जेवणाचा डब्बा पोच करण्यासाठी म्हणून.
९३) पासपोर्ट व्हेरीफिकेशन म्हणून.
९४) लग्नं समारंभाची परवानगी म्हणून.
९५) एफ आय आर ची नक्कल पोलिस स्टेशन मधुन काढून देतो म्हणून.
९६) विहीर ब्लासंटिग ट्रॅक्टर.
९७) खडी क्रशर वाहतूक.

▪️नोंदणी विभागातील भ्रष्टाचार प्रकरणे ही संबधीत लोकसेवकांनी खालील शासकीय कार्यवाही करताना केल्याचे आढळते.:

१) सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांची निवडणूक प्रक्रियेच्या अहवालाची प्रत देण्यासाठी.
२) सरकारी परवाना मंजर होण्याची शिफारस करण्यासाठी.
३) खरेदी केलेल्या जमिनीचे खरेदीखत करण्यासाठी.
४) शोकॉज नोटीसचे देणेसाठी व प्रकरण मिटवून देणेसाठी.
५) व्यावसायिक गाळा आईचे नावावरून फिर्यादीच्या नावावर झालेल्या आदेशाची अमंलबजावणी करण्याकरिता
६) ग्राहकाचे बक्षिस पत्र बनविण्याकरीता.
७) कुलमुखत्यारपत्र दस्ताची नोंद घेण्याकरीता
८) जीमन बक्षीसपष नोंदणीची प्रत देण्यासाठी.
९) जागेचा भाडेपट्टा करण्यासाठी तसेच दस्तासाठी स्टॅम्प ड्युटी भरण्यात आलेली पावती जमा करुन दस्त देण्याचे कामासाठी.
१०) हक्कसोडपत्राची नक्कल देणेकरिता
११) मुलीचे विवाहाचे नोंदणीचे प्रमाणपत्र देणेसाठी.
१२) शेतीचे मुल्यांकन दाखला देण्यासाठी.
१३) आशिलाच्या मालमत्ते संदर्भात इंन्डेक्सची प्रत देण्याकरीता.
१४) कुल मुख्यत्यार पत्र तयार करुन दिलेल्या कामाचा मोबदला म्हणून व ते नोंदणी करण्याकरीता.
१५ ) जमिनिचे क्षेत्र वेगवेगळे करण्यासाठी.

▪️भुमी अभिलेख विभागातील भ्रष्टाचार प्रकरणे ही संबधीत लोकसवेकाने खालील शासकीय कार्यवाही करताना केल्याचे आढळते.:

१) जागेची मोजणी करण्यासाठी
२) जमिनीची प्रॉपर्टी रजिस्टरला नोंद करुन प्रॉपर्टी कार्ड देणेसाठी.
३) प्लॉटवर नांव लावून नांवाचा नवीन उतारा देण्याकरिता
४) केसचा सर्वे रिपोर्ट पाठविण्याकरीता.
५) लॉटचे फेरफार करून रेकार्डवर नाव नोंद होण्याकरिता
६) शेतीचे मोजमाप करुन पोटहिस्से करुन देण्यासाठी
७) गांव नकाशे लवकर मिळण्यासाठी
८) शेत जमिनीची मोजणी करून हदद कायम करून खुणा करून देण्यासाठी ९) वारसा हक्काने फेरफार नोदीनुसार नविन पि.आर. कार्ड देण्यासाठी
१०) शिवार नकाशा नक्कल देण्यासाठी
११) घराची नोंद प्रॉपर्टी कार्डला नोंद घेवून प्रॉपर्टी कार्डचा उतारा देण्यासाठी
१२) शेत जमिनीचे फाळणी नकाशा, टिपण व गुन्हाकार बुक च्या नकला देणेसाठी
१३) रजिष्टर हक्क सोडणेकामी तसेच कजाचा बोजा चढविण्यासाठी

▪️ग्रामविकास विभागातील भ्रष्टाचार प्रकरणे ही संबधीत लोकसवेकाने खालील शासकीय कार्यवाही करताना केल्याचे आढळते.:

१. पदोन्नतीचे प्रस्ताव शिफारस करून अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे पाठविण्याकरीता.
२. शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ मंजूर करून देण्याकरीता.
३. जागांच्या नोंदणीकरीता.
४. शासकीय अनुदानांचा लाभ देण्याकरीता.
५. मृताचे नंतर वारसाचे नांव फेरफार करण्यासाठी.
६. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिरीचे ई मस्टरमध्ये अभिप्राय नोंदवून स्वाक्षरी करणे व त्याकामाची मोजमाप पुस्तीकेत नोंद घेवून बील पाठविण्यासाठी.
७. एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास कामकाज अंतर्गत मंजूर घरकुलाचे अनुदानासाठी पाठविलेल्या प्रस्तावात नांवात झालेला बदल दुरुस्ती करण्यासाठी.
८. घरकुलाचे बील काढण्यासाठी.
९. रोजगार हमी योजनेअंतर्गत रस्ता, विहिर व पाणलोट क्षेत्र इ. कामासाठी लावलेल्या मजुरांचे मेजरमेंट बुक करुन बिलाची व मानधनाची रक्कम काढण्यासाठी. 
१०. खरेदी केलेल्या मोकळ्या जामिनीची नोंद ग्रामपंचायतीच्या अभिलेखावर घेवून नमूना क्रमांक ८ चा उतारा देण्यासाठी.
११. गावातील तंटामुक्ती पुरस्कारांचे रक्कमेबाबतची तक्रारीची चौकशी निरंक करण्यासाठी.
१२. अंगणवाडी बांधकामाची चौकशी निरंक धरुन बांधकामाचे मोजमाप (एम.बी.) करण्याचे आदेश देण्यासाठी.
१३. नवीन बांधलेल्या घराला घरपट्टी सुरु करुन नाहरकत प्रमाणपत्र देण्यासाठी. 
१४. घराची नोंद ग्रामपंचायत कार्यालयात घेण्यासाठी.
१५. आंतरजातीय विवाह केलेल्या नवीन जोडप्यांना महाराष्ट्र शासनाकडून देण्यात येणाऱ्या अनुदानाचा चेक देण्यासाठी...
१६. मंजूर रजेच्या वेतनाचे बिलाच्या धनादेशावर सही करण्यासाठी.
१७. मालमत्तेवर बॅक कर्ज बोजाची नोंद ग्रामपंचायतीचे ८-अ रेकॉर्डला घेवून सत्यप्रती देण्यासाठी.
१८. अनाधिकृत बांधकामाची परवानगी देण्याबाबत.

▪️वजन व मापे विभागातील भ्रष्टाचार प्रकरणे ही संबधीत लोकसवेकाने खालील शासकीय कार्यवाही करताना केल्याचे आढळते.

(१) वजन मापे वैधता पडताळणी प्रमाणपत्र देण्यासाठी.
(२) अर्जावरुन टँकरला प्रमाणपत्र देण्यासाठी.
(३) पेट्रोलपंपाच्या मापाची पडताळणी करून देण्यासाठी.

▪️महिला व बाल विकास विभागातील भ्रष्टाचार प्रकरणे ही संबधीत लोकसेवकांनी खालील शासकीय कार्यवाही करताना केल्याचे आढळते.:

१. फिर्यादी यांचे आंगणवाडीचे काम सुरू ठेवण्यासाठी.
२. फिर्यादी यास शासनाकडून देय असलेल्या रक्कमेचा धनादेश काढण्यासाठी. 
३. महिला बचत गटाची अंगणवाडी केंद्राला आहार पुरवठा मानधन त्यांचे बॅक खात्यात जमा करणेसाठी.
४. बलात्कार पिडीत महिला मनोधैर्य योजनेअंतर्गत आदीवासी महिला म्हणून अनुदान मिळण्याकरीता.

▪️क्रिडा विभागातील भ्रष्टाचार प्रकरणे ही संबधीत लोकसेवकांनी खालील शासकीय कार्यवाही करताना केल्याचे आढळते.

१) व्यायाम शाळा बांधकाम अनुदानाच्या रक्कमे पैकी राहीलेली रक्कम संस्थेच्या खात्यामध्ये जमा करण्याकरीता
२) अर्थसहाय्य मंजुर करून चेक मिळवुन देण्यासाठी.
३) व्यायाम शाळा व युवक कल्याण शिबीराचे मंजुर केलेले अनुदाना बददल तसेच तक्रारदाराचे मित्राचे व्यायाम शाळेचे प्रस्ताव मंजुर करण्यासाठी.
४) व्यायाम शाळेच्या बांधकामासाठी मंजुर झालेल्या पहिल्या हप्त्याचे अनुदानाची रक्कम बॅक खात्यावर जमा करण्यासाठी

▪️म.रा.वि.वि.कं. विभागातील भ्रष्टाचार प्रकरणे ही संबधीत लोकसवेकाने खालील शासकीय कार्यवाही करताना केल्याचे आढळते.

१) विदयुत ट्रान्सफारमर बसवुन त्यात विदयुत पुरवठा चालू करुन देण्यासाठी
२) नवीन बांधकामाचे स्किममध्ये विदयुत पुरवठा जोडणी
३) विद्युत पोल रोवणे, तार ओढणे व विद्युत कनेक्शन देण्याचे कामासाठी 
४) नविन मिटर बसविण्यासाठी
५) विज पडताळणी दरम्यान विज चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाइी व लाईन डायरेक्ट जोडुन देण्यासाठी.
६) सदोष मिटरमुळे थकीत असलेले बिल कमी करुन देण्यासाठी.
७) विद्युत मिटरचा खंडीत विज पुरवठा बिल भरणा केल्यानंतरची विज जोडणी करण्याच्या कामासाठी
८) कंत्राटी कामगारास पैसे न दिल्यास नौकरीवरुन काढुन टाकण्याची धमकी देवून.
९) ऑफीसचे तोडलेले वीज कनेक्शन पूर्ववत जोडणी केलेचे मोबदल्यात.
(१०) वडीलोपार्जित जमीनीचे अकृषक परवानगीसाठी नाहारकत प्रमाणपत्र देण्यासाठी. 
११) अर्जित रजेचा अर्ज मंजुरीसाठी उप विभागीय महावितरण कार्यालय, तुळजापुर येथे पाठविण्यासाठी.
१२) शेतातील पोलवर अवैधरित्या घेतलेले केबल कनेक्शनवर कारवाई न करण्याकरीता.
१३) विहीरीवर शेती पंपासाठी नवीन विज कनेक्शनच्या कामासाठी

▪️महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ विभागातील भ्रष्टाचार प्रकरणे ही संबधीत लोकसवेकाने खालील शासकीय कार्यवाही करताना केल्याचे आढळते.

१) प्लॉटवर बांधकाम करणेसाठी अतिरिक्त एफएसआयची परवानगी मिळवुण देणेसाठी
२) बिलाचे पेमेंट देणेसाठी.
३) वेतनवाढ मिळून दिल्याचे मोबदल्यात तसेच भविष्यात परिवीक्षाधिन कालावधीचे मंजूरीचे वेतनवाढ फरकाची थकबाकीचे देयक काढण्याकरीता.
४) भुखंडाचे कागदपत्र देण्यासाठी.
५) कर्ज काढण्यासाठी आवश्यक असलेले संमतीपत्र मिळवून देण्यासाठी.
६) सव्र्हस चार्जची थकबाकी कमी केल्याचे मोबदल्यात व त्या प्लॉटवरील नो डयुटजचे प्रमाणपत्र देण्यासाठी.
७) प्लॉट हस्तांतरण करण्यासाठी.
८) एम.आय.डी.सी चा प्लॉट मंजुर करण्यासाठी

▪️सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातील भ्रष्टाचार प्रकरणे ही संबधीत लोकसेवकांनी खालील शासकीय कार्यवाही करताना केल्याचे आढळते.

१. अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीकडून जातपडताळणीबाबत अनुकुल अहवाल मिळण्यासाठी
२. तक्रारदार यांची पाल्यास मिळणारे शिक्ष्यवृत्तीकरीता जात पडताळणी प्रमाणपत्राचे काम लवकरात लवकर करुन देणेसाठी
३. विभागीय जाती प्रमाणपार पडताळणी समितीकडून जातीचे प्रमाणपााची पडताळणी करणेकरीता
४. जात पडताळणी प्रमाणपत्राचे काम करुन देण्यासाठी
५. तक्रारदार यांना परस्पर संपर्क करून जात पडताळणी प्रमाणपत्र देण्याकरीता
६. विभागीय जात पडताळणी प्रमाणपत्र समितीकडून जात प्रमाणपत्राची वैधता प्रमाणपत्र मिळणेकामी

▪️विक्रीकर विभागातील भ्रष्टाचार प्रकरणे ही संबधीत लोकसेवकांनी खालील शासकीय कार्यवाही करताना केल्याचे आढळते.

१. प्रकरण बंद करणेसाठी / एक्स पार्टी ऑर्डर रद्द करणेसाठी / दंडाची रक्कम कमी करण्यासाठी. २. ऑडिट तपासणीमध्ये आक्षेप न घेणे / ऑडीटमधील आक्षेपार्ह नोंद वगळणे.
३. बिल काढण्याकरीता / व्हॅटच्या परताव्याचा चेक देण्यासाठी / व्हॅट नंबरचे रजिस्ट्रेशनसाठी.
४. व्यवसाय कराचा दाखला / कराची रक्कम कमी करून देणेसाठी.
५. विक्रीकर न भरणे तसेच कारवाई न करणेसाठी / अतिरीक्त कराची रक्कम परत देण्यासाठी.
६. वेतन फरकाचे बिल मंजूर करणेसाठी / पेन्शन व फरकाची रक्कम काढणेसाठी.
७. वेतनपडताळणीच्या त्रुटींची पुर्तता करून सुधारीत वेतन निश्चीती करण्यासाठी.
८. पोष्ट एजंटचे लायसन्स नुतनीकरण करण्यासाठी.
९. फौजदारी गुन्हा दाखल न करण्याकरीता. 
१०. परवाना नुतनीकरण करण्यासाठी.
▪️राज्य परिवहन महामंडळ विभागातील भ्रष्टाचार प्रकरणे ही संबधीत लोकसवेकाने खालील शासकीय कार्यवाही करताना केल्याचे आढळते.

१. तक्रारदार यांनी बस स्थानकात दुकानासाठी जागा मिळणेकरीता अर्ज केला होता व बयाना रक्कम भरली होती. त्यांना दुकानासाठी जागा मिळाली नाही म्हणून बयाना रक्कम परत देण्याकरीता.
२. तक्रारदार यांना चांगली डयुटी लावण्याकरिता.
३. फिर्यादी यांनी भविष्य निर्वाह निधी मधून कर्ज मिळणेकरिता केलेला अर्ज वरिष्ठांकडे मंजुरीसाठी सादर करण्याकरिता.
४. फिर्यादी यांना बस स्थानकावर पाण्याचे पाउच विक्रीचा परवाना देण्याकरिता.
५. कागदपत्र व लायसन्सची मागणी करुन ते नसल्यामुळे पैशाची मागणी केली. 
६. फिर्यादीस इतर कर्तव्य देण्याकरीता.
७. फिर्यादी यांचेविरूध्द चालू असलेली विभागीय चौकशी बंद करून देतो अशी बतावणी करून.
८. वैद्यकीय बिलाची पडताळणी करुन देणे व रोखीकरणासाठी.
९. बस स्टँडमधील रॅम्प सिमेंट कॉक्रीटच्या बांधकामाचे प्रलंबित बील काढण्यासाठी.
१०. प्रसुती रजा मंजूर करुन रजा कालावधीचे बील काढण्यासाठी.
११. वैद्यकीय बिलाच्या देयकाची पूर्तता करुन देण्यासाठी.
१२. स्वच्छालय आराखडा मंजूर करण्यासाठी.


▪️प्रदुषण नियंत्रण मंडळ विभागातील भ्रष्टाचार प्रकरणे ही संबधीत लोकसेवकांनी खालील शासकीय कार्यवाही करताना केल्याचे आढळते.

(१) धोकादायक कचरा उचलण्याचे लायसन्स नुतणीकरणासाठी तपासणी अहवाल मुंबई (२) औषध कंपनीला संमतीपत्र देण्याकरीता. कार्यालयात पाठविणेसाठी.
(३) तक्रारदार यांचा सोलर बॅटरीचा व्यवसाय सुरु करण्याकरीता आवश्यक असणारे संमती पत्र वरिष्ठ कार्यालयाकडून मिळवून देण्याकरीता. 
(४) शासकीय कार्यालयातील संगणकावरील अॅन्टीव्हायरस खरेदी करण्यासाठी बनावट लेख व किंमती दस्तऐवज तयार करून गैरव्यवहार केला.

▪️सार्वजनिक बांधकाम विभागातील भ्रष्टाचार प्रकरणे ही संबधीत लोकसेवकांनी खालील शासकीय कार्यवाही करताना केल्याचे आढळते.

१. विद्युत विभागाची अनुद्याप्ती पट पडताळणी करण्याकरिता.
२. अपघाताचे पास होवून आलेले वैद्यकीय बिल अदा करण्याकरीता.
३. ठेकेदार म्हणून केलेल्या कामाचे बिल मंजूर करण्याकरीता.
४. शेतजमीन बिनशेती करण्याकरीता ना हरकत प्रमाणपत्र देण्याबाबत. 
५. विद्युत ठेकेदाराचा परवाना देण्याकरीता.
६. शासकीय निवास नातेवाईकांच्या नावावर ट्रान्सफर करण्यासाठी.
७. नविन राईस मिल बनविण्याकरीता अ—षी नाहरकत प्रमाणपत्र देण्याकरीता. 
८. शासकीय निवासस्थान नातेवाईकाचे नावावर वर्ग करण्यासाठी.
९. शेतजमीन रस्ता रुंदी करण्यात गेल्यामुळे त्याची मोबदला रक्कम मिळण्याबाबत..

समाज कल्याण विभागातील भ्रष्टाचार प्रकरणे ही संबधीत लोकसवेकाने खालील शासकीय कार्यवाही करताना केल्याचे आढळते.

१. फिर्यादीं यांना भविष्य निर्वाह निधीचा चेक देण्यासाठी.
२. फिर्यादी यांना संगणक खरेदी करण्यासाठी मंजूर झालेल्या कर्जाचा धनादेश देण्यासाठी.
३. जात पडताळणीसाठी केलेल्या अर्जाबाबत राखून ठेवलेला निर्णय देण्यासाठी. 
४. फिर्यादी यांचे शाळेचा वेतनोत्तर अनुदानाचा धनादेश देण्यासाठी.
५. तक्रारदार यांचे जात पडताळणी प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी.
६. फिर्यादी यांना शासकीय मागासवर्गीय वस्तीगृह येथील विद्यार्थ्याना पुरवठा केलेल्या भोजनाचे मंजुर झालेले बील देणेकरीता व मार्च २०१३ चे बील मंजुरीकरीता पाठविण्याकरिता.
७. फिर्यादी यांच्या पत्नीच्या नांवे असलेल्या संस्थेचे देयक देण्याकरिता.
८. फिर्यादी यांच्या संस्थेचा प्रस्ताव शिफारसीसह विभागीय आयुक्त कल्याण कार्यालय, औरंगाबाद यांना पाठविण्यासाठी.
९. फिर्यादी यांनी केलेल्या पेस्ट कंट्रोलच्या कामाचे बिल मंजूर करण्यासाठी
१०. फिर्यादी यांनी रस्त्याच्या कॉक्रीटीकरणाकरीताचा ठराव विशेष प्रस्तावासह समाज कल्याण अधिकारी यांचेकडे पाठविण्याकरीता.
११. आंतरजातीय विवाह केलेल्या नवीन जोडप्यांना शासनाकडून देण्यात येणारा प्रोस्ताहन अनुदान देण्याकरीता.
१२. फिर्यादी यांचे शेत जमीनीचे फेरफार करवून घेवून सात बारा अभिलेखात नोंद घेण्यासाठी. 
१३. शैक्षणीक साहित्य खरेदीकरीता.
१४. अल्पसंख्याक खाजगी शाळांना अनुदान मंजूर करण्यासाठी.
१५. कारणे दाखवा नोटीस रद्द करण्यासाठी.

▪️पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातील भ्रष्टाचार प्रकरणे ही संबधीत लोकसवेकाने खालील शासकीय कार्यवाही करताना केल्याचे आढळते.

१. स्वास्थ प्रमाणपत्र देण्याकरीता तसेच नुतनीकरण करण्याकरीता.
२. नियुक्तीचे आदेश देण्याकरीता. ३. इतर प्रशासकिय कारणे. (अर्जीत रजेचे वेतन बिल काढण्याकरीता )
४. रुग्णावर केलेल्या उपचारांबाबत.
५. रक्त नमुन्यांची तपासणी करतांना मागणी करणे.
६. शासकिय योजनेअंतर्गत मिळणाऱ्या निधीची बिले मंजूर करण्याकरीता.
७. औषधी विक्री परवाना मंजूर करण्याबाबत. सरकारी रूग्णालयात औषधे पुरवठा करण्याबाबतची निवीदा तसेच ठेकेदारी मिळण्याबाबत.
८. आरोग्य सेविका संपल्यानंतर पून्हा नविन ऑर्डर काढण्यासाठी. जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम अंर्तगत लावलेल्या वाहनाच्या भाडयाचे धनादेश देण्यासाठी.
९. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मानधनांचे चेक देण्यासाठी.
१०. महिलेची प्रसुती करण्यासाठी प्रसुती गृहात व्यवस्था करण्यासाठी...
११. मुदत संपल्यानंतर आरोग्यसेवीका म्हणून नवीन आदेश काढण्यासाठी.
१२. फॉर्म 'सी' चे नोंदणी करण्यासाठी.
१३. भाडे तत्वावर घेतलेल्या वाहनाचे बील काढण्यासाठी.
१४. बदली आदेश काढण्यासाठी.
१५. गर्भपात करण्याच्या कामात मदत करण्यासाठी.
१६. कारणे दाखवा नोटीसवर कारवाई न करणेसाठी.

▪️उच्च व तंत्र शिक्षण विभागातील भ्रष्टाचाराची कारणे. 

०१) वेतन पडताळणी व वेतन निश्चिती 
०२) कागदपत्रे साक्षांकित करून देणे.

▪️कौशल्य विकास व उद्योजकता विभागातील भ्रष्टाचार प्रकरणे ही संबधीत लोकसवेकाने खालील शासकीय कार्यवाही करताना केल्याचे आढळते.

१. वायरमन ट्रेडच्या अंतिम वर्षाचे प्रात्याक्षिक परिक्षामध्ये जास्तीत जास्त गुण देण्याकरिता.
२. विद्यार्थ्यास वार्षिक प्रात्यक्षीक परिक्षेमध्ये उत्तीर्ण होणेसाठी आवश्यक गुण देण्यासाठी.
३. गैरहजर विद्यार्थ्याचा गैरहजेरी कालावधी अॅडजस्ट करून परिक्षेमध्ये बसु देण्याकरिता.
४. तक्रारदाराचा थकीत पगार देण्यासाठी.
५. जमिनीवर एमआयडीसी चा शेरा असल्याने सदरच्या जमिनीचे बक्षीसपत्र तक्रारदार यांचे नांवे करण्याकरीता.
६. औदयोगीक प्रशिक्षण संस्थेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याचा गैरहजेरी कालावधी नियमीत करण्याकरीता.
७. शिकाउ पात्र यादीत नाव घालून शिकाऊ उमेदवार म्हणुन ऑर्डर देण्यासाठी. 
८. मार्कलिस्टमध्ये दुरुस्ती करुन नवीन मार्कलिस्ट देण्यासाठी.

▪️प्रादेशिक परिवहन विभागातील भ्रष्टाचार प्रकरणे ही संबधीत लोकसेवकांनी खालील शासकीय कार्यवाही करताना केल्याचे आढळते.

१. अपघातामधील वाहनाच्या नोंदणी प्रमाणपत्राचा उतारा व चालक परवाना देण्याबाबत.
२. नविन खरेदी केलेल्या वाहनाला, हवा असणारा नोंदणी क्रमांक मिळण्यासाठी. 
३. वाहन परमिट निलंबित न करण्यासाठी.
४. वाहनांचे मुळ कागदपत्र परत करण्याकरीता. चालक परवाना नुतनीकरणाकरीता तसेच जून्या वाहनांची तपासणी करण्याबाबत.
५. ड्रायव्हिंग स्कुलमध्ये चालकाचे प्रशिक्षण देणाऱ्या प्रत्येक प्रशिक्षणार्थीचे ड्रायव्हिंग लायसन्स देण्याकरीता.
६. अॅटोरिक्षाचे योग्यता प्रमाणपत्र नुतणीकरण करण्यासाठी.

▪️विधी व न्याय विभागातील भ्रष्टाचार प्रकरणे ही संबधीत लोकसवेकाने खालील शासकीय कार्यवाही करताना केल्याचे आढळते.

१. न्यायालयात सुनावणी चालू असलेल्या खटल्यात सरकारी वकील म्हणून मदत करण्यासाठी.
२. प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी कोर्टात फौजदारी प्रकरण चालविणारी विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता हिने तक्रारदाराला केसमधुन निर्दोष सोडण्याकरीता व न्यायालयाने दिलेल्या निकालाविरुद्ध अपिल न करण्याकरीता.
३. तक्रारदार यांना बेल सर्टीफाईड कॉपी देण्याकरीता
४. जिल्हा ग्राहक न्यायालयात मदत करण्याकरीता
५. आरोपीताने फिर्यादी यांस नोटरी पब्लिक नियुक्ती कामाकरिता
६. सुरु असलेल्या केसमध्ये सोईची तारीख देण्याकरीता
७. दिवाणी न्यायालयात दाखल केलेल्या दाव्यातील फाईल लवकर शोधून, तारीख घेवून समन्स बजावण्याकरीता 
८. मुंबई पोलीस अधिनियम १९५० चे कलम ४१ (ड) अन्वये कायरवाई करणेसाठी दिलेल्या अर्जावर कारवाई करणेसाठी
९. कोर्टात सुरु असलेल्या केस मधील विरोधकाविरुध्द वॉरंट काढण्यासाठी. 
१०. न्यायालयाची पोलीस ठाणेस 'से' अहवालाची प्रत पाठविण्याकरीता.
११. फिर्यादी हे दारिद्र रेषेखाली मोडत असल्याने फियादीस विधी सेवा प्राधिकारणाकडुन वकिल विनामुल्य पुरविण्यात आले असताना फिर्यादीची केस कोर्टात दाखल करून चालविण्यासाठी.
१२. दंडाधिकारी न्यायालयात प्रलंबित असलेल्या जमिनीबाबतच्या केसेसमध्ये फिर्यादी यांच्या बाजुने निकाल देण्यासाठी.

वरील प्रमाणे लिहलेले सोडुन अजुन कोणत्याही भागात वेगवेगळ्या मार्गाने हप्ता वसुली चालत असेल तर ते पण कळवावे.

👉 मित्रांनो लाच देणं आणि लाच घेणं या दोन्ही गोष्टी कायद्याने गुन्हा आहेत. आपल्या आसपास असे कोणी असेल तर तात्काळ खालील पर्याय वापरा.
सर्वसामान्य माणसाच्या घामाच्या पगारातून टॅक्स रूपाने जाणाऱ्या पैशातून होणाऱ्या पगारात जी कामे करायला हवीत, ते न करता अवैध मार्गाने संपत्ती कामावणाऱ्या महाभागांची नावे समाजाच्या पुढे येऊद्या!

मित्रांनो जागे व्हा, आपले हक्क, अधिकार आणि कर्तव्ये यांना जागे करा, लाचारी सोडा आणि कामाला लागा!

मित्रांनो खालील महत्वपूर्ण पत्ता, वेबसाईट, ईमेल विसरू नका, त्याचा नक्की वापर करा!

☑️ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई विभाग 91,सरपोचखानवाला रोड, वरळी मुंबई




☑️ www.acbmaharashtra.net

☑️ टोल फ्री नं-1064, फोन नं- 022 2492 1212

☑️ फॅक्स क्रं-022 2492 2618, वॉट्सउप क्रं- 9930 99 7700


मित्रांनो, जागरूक नागरिक होऊन समाजातील अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार, कमी करणे आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे त्यासाठी, वाचन, चिंतन, मनन, सकारात्मक चर्चा आवश्यक आहे.

अशीच नवनवीन माहिती वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम, वेबसाईट या सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॉटफॉर्मवर अवश्य फॉलो करा.

Follow us on,

फेसबुक- 

वेबसाईट-

फेसबुक ग्रुप- 

टेलिग्राम- 


फेसबुक पेज -







टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वीज ग्राहकांचे अधिकार! ग्राहकांनी तक्रार कुठे करावी!

कागदपत्रे नोटरी करणेसाठी जाता तेव्हा किती फी देता? त्याची पावती घेता का? नोटरी बोगस तर नाही ना?

माहितीचा अधिकार कायदा 2005 (RTI-Right to Information Act 2005) म्हणजे काय?