वाहन टोइंग, नियमावली आणि नागरिकांचे अधिकार!
टोइंग व्हॅन मार्फत करण्यात येणारी कारवाई याचा हेतू वाहतुकीस होणारा अडथळा त्वरित दूर करणे हा असून केवळ दंड आकारणी असा नाही असे स्पष्ट आदेश आहेत.
वाहन उचलण्यापूर्वी किंवा उचलत असताना त्याठिकाणी तो वाहन चालक आला तर नियमाप्रमाणे दंड वसूल करावा.
जागेवर दंड वसूल केल्यानंतर वाहन टो न करता त्याच्या ताब्यात द्यावे असेही स्पष्ट आदेश आहेत.
वाहन टोइंग करत असताना वापरायचे काही नियम याचे कार्यालयीन आदेश खालीलप्रमाणे आहेत.
● 1) टोईंग वाहनावर नेमण्यात येणारा अंमलदार पोलीस हवलदार वाहतूक किंवा त्यापेक्षा वरिष्ठ दर्जाचा अंमलदार नेमण्यात यावा.
● 2) टोईंग वाहनावरील अंमलदार हा टोइंग वाहनाचा प्रभारी असल्याने त्याच्या नियंत्रणाखालील टोईंग वाहनावरील चालक व कामगार काम करतील.
● 3) टोईंग व्हॅन वरील अमलदार कर्तव्य करीत असताना वाहनावरील कारवाई करण्यापूर्वी मेगाफोन द्वारे उद्घोषणा करून, त्यानंतर वाहन उचलून वाहन टोइंग व्हॅन वर ठेवतील.
● 4) टोईंग द्वारे कारवाई करत असताना वाहनचालक उपस्थित राहिल्यास त्याच ठिकाणी अंमलदार हा कायदेशीर कारवाई करून सशुल्क दंडाची पावती जागेवर देईल, वाहन उचलून घेऊन जाणार नाही व वाहन टोईंगचे चार्जेस घेणार नाही.
● 5) टोईंग व्हॅन वरील अंमलदारांनी वाहनावर केलेले कारवाई संबंधाने वाहन उचललेल्या ठिकाणी खडूने विभागाचे नाव लिहावे.
● 6) टोईंग व्हॅन वरील अंमलदार टोईंग वाहनांना घातलेल्या अटी व शर्ती यांची जाणीव करून देतील व त्याप्रमाणे चालक कामगार राहत असल्याची खात्री करतील.
● 7) टोईंग व्हॅन वरील अंमलदार तसेच चालक व त्यावरील कामगार जनतेशी सौजन्याने वागतील कोणतेही उद्धट वर्तन करणार नाहीत.
● 8) टोईंग व्हॅन वरील अंमलदार हा कोणत्याही परिस्थितीत कारवाई करताना कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही. कोणत्याही व्यक्तीचा फोन आला तरी कारवाई केल्याशिवाय वाहन सोडणार नाही.
● 9) टोईंग वाहनावरील अंमलदार अथवा प्रभारी अधिकारी यांनी टोईंग वाहनावरील चालक, कर्मचारी व कामगार यांच्याकडून अटी व शर्तीचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आल्यास तात्काळ या कार्यालयास अहवाल सादर करतील.
● 10) टोईंग वाहनावरील कर्मचारी हा 18 वर्षावरील असावा तसेच स्वच्छ निळ्या गणवेशात नीटनेटका असावा, केस दाढी वाढलेली नसावी रात्रीच्या वेळेस स्वयंप्रकाशित गणवेश वापरती.
● 11) टोईंग वाहनावरील कर्मचारी हे कारवाईदरम्यान कोणत्याही प्रकारे मध्यस्थाची भूमिका करणार नाही किंवा स्वतःहून निर्णय घेणार नाही.
● 12) टोईंग वाहनावर हंडीकॅम असावा तसेच हंडीकॅम बॅकअप दहा दिवसाचा असावा सदर वाहनावरील कॅमेरे द्वारे करण्यात आलेले चित्रीकरण वाहन मालकांनी संग्रहित करून दर महिन्याला संबंधित प्रभारी अधिकारी यांच्याकडे अभिलेखावर ठेवतील.
👉 नो पार्किंगमध्ये उभी असलेली वाहने टोचन करण्यापूर्वी नागरिकांना कोणकोणत्या प्रकारच्या सूचना दिल्या जातात याबाबत असललेल्या कार्यालयीन आदेशाची प्रत माहिती अधिकारातून मागणी केल्यानंतर पुरवण्यात आलेली पीडिफ फाईल खाली दिलेल्या लिंकवर अपलोड केलेली आहे. मित्रांनो डाउनलोड करा, वाचा, इतरांना वाचण्यासाठी पाठवा.
👉 गाड्या उचलण्यासाठी देण्यात येणारा ठेका आणि शासन यामध्ये झालेल्या करारामध्ये कोणकोणत्या अटी आणि शर्ती असतात, कराराची प्रत खाली दिलेल्या लिंकवरून डाउनलोड करून वाचावी ही विनंती आहे.
👉 नुकतेच एका मॅजिस्ट्रेट कोर्टाने वाहतूक पोलिसांना गाडी जप्त करण्याचे अधिकार नाहीत असे आदेश दिलेले आहेत, सदर आदेशाची प्रत पुढील लिंकवरून डाउनलोड करून वाचावी ही विनंती आहे.
👉 मित्रांनो "वरील सगळ्या प्रश्नांचा कागदोपत्री जाब विचारण्याची जबाबदारी आणि कर्तव्ये", तुमचे, आमचे सर्वसामान्य माणसाचे आहे.
कोणीच जाब विचारत नाही, म्हणून दिवसाढवळ्या संपूर्ण शहरात नाहक आणि विनाकारण दिवसभर अशाप्रकारे गाड्या उचलून हप्ते वसूल करणे हे एकप्रकारे छळवणूक व नागरिकांची पिळवणूक आहे.
माहिती गोळा करा, पत्रव्यवहार करा, पाठपुरावा करा, आपल्या शहराचे अनेक फेसबुक, वॉट्सअप ग्रुप आहेत त्यावर पोस्ट करून द्या, लोकांना माहिती होऊद्या, जागे होऊद्या.
शहरातील 50 हजार रुपये महिना कमावणारा प्रत्येक माणूस महिन्याला साधारणपणे,
इन्कम टॅक्स, मालमत्ता कर, पाणीबिल, वीजबिल असे मिळून जवळपास 2 ते 3 हजार रुपये सरकारला छुपे कर रूपाने देतो.
पण हे पैसे कशाप्रकारे, कुठे, कोण खर्च करतोय, त्याबद्दल्यात आपल्याला काय मोबदला मिळतोय याचा थांगपत्ता नसतो!
व आयुष्यभर कधीही विचरण्याचा प्रयत्नही करत नाही!
तुम्हीच सांगा देश अधोगतीकडे जाईल की प्रगतीकडे जाईल, भ्रष्टाचार कमी होईल की, वाढेल?
#जागोग्राहक #जागोनागरिक जागरूक होऊयात
● 09 डिसेंबर 2017 चे ठाणे वाहतूक पोलीस उपयुक्तांचे आदेश.
● 27 डिसेंबर 2017 चे ठाणे पोलीस आयुक्तांचे आदेश.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा