पोस्ट्स

एप्रिल, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

लोनचे हप्ते भरले नाही तर बँक/फायनान्स कंपनी गाडी, टीव्ही घेऊन जाऊ शकते का? नियम काय आहे? घ्या जाणून.

इमेज
लोनचे हप्ते भरले नाही तर बँक / फायनान्स कंपनी गाडी , टीव्ही घेऊन जाऊ शकते का ? नियम काय आहे ? घ्या जाणून . विशेष लेखमाला – जागो ग्राहक जागो – लोनचे हप्ते आणि वसुली आज मितीस चार चाकी गाडी खरेदी असो, दोन चाकी गाडी खरेदी असो, घरात मोठ्या वस्तू जसे टीव्ही, फ्रिज इत्यादी. लोक फायनान्स कंपनी कडून कर्ज घेऊन कधी ० रुपये डाऊन पेमेंट ने तर कधी १०% रक्कम भरून कर्ज काढून घेतात. त्यासाठी त्यांना आपल्या गाडीवर आरटीओ मध्ये हायपोथिकेशन (कर्ज देणाऱ्याचे नाव) ची नोंद घालून ठेवावी लागते. बँक आणि फायनान्स कंपनी कडून गाडी घेणे साठी, घरातील वस्तू घेणे साठी घेतलेले कर्ज ग्राहकांनी महिन्याला ठराविक ई एम आय द्वारे परत भरावे असे ग्राहक आणि फायनान्स कंपनी मधील करारात नमूद असते. अखिल भारतीय ग्राहक पंचायत मध्ये बरेच ग्राहक येतात की त्यांना कोविड मुळे किंवा इतर कारणाने पगार वेळेवर मिळत नाही त्यामुळे एक दोन महिने हप्ते भरले नाहीत म्हणून गाडी/टीव्ही फायनान्स कंपनीने ओढून नेली आहे असे सांगतात. त्यावर काय करावे असा सल्ला विचारला जातो. वास्तविक हायर-परचेस करारांतर्गत जेव्हा कर्जाच्य...

एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व प्रधान मंत्री जन आरोग्य योजना याविषयी माहिती जाणून घेऊयात.

इमेज
▪️एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व प्रधान मंत्री जन आरोग्य योजना याविषयी माहिती घेऊयात▪️ 👉 राज्यात योजनेचा पहिला टप्पा दिनांक २ जुलै २०१२ पासून गडचिरोली, अमरावती नांदेड, सोलापूर,धुळे,रायगड, उपनगरीय मुंबई, मुंबई शहर या आठ जिल्ह्यात कार्यान्वित करण्यात आला. महाराष्ट्र शासनाने दिनांक २१.११.२०१३ पासून ही योजना राज्यव्यापी केलेली आहे. दिनांक ०२ जुलै २०१२ पासून राजीव गांधी जीवनदायी योजना या नावाने ही योजना सुरु झाली व दिनांक १३ एप्रिल २०१७ च्या शासन निर्णयान्वये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना या नावाने सुरु ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे. 👉  दिनांक २३.०९.२०१८ पासून आयुषमान भारत - प्रधान मंत्री जन आरोग्य योजना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेबरोबर एकत्रितपणे राबविण्यात येत आहे.   👉 दिनांक ०१.०४.२०२० पासून सुधारित एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व प्रधान मंत्री जन आरोग्य योजना योजना राज्यामध्ये ई निविदा पद्धतीने निवड करण्यात आलेल्या युनायटेड इंडिया इंशुरंस कंपनीतर्फे राबविण्यात येत आहे. 👉  उद्देश:  राज्यातील जनतेलागंभीर आजार...

जाणून घेऊयात ई-श्रम म्हणजे काय?

इमेज
केंद्र सरकारने ‘ई-श्रम पोर्टल’ सुरू केलं आहे, जे असंघटित कामगारांसाठी खूप प्रभावी ठरणार आहे. कामगारांना या पोर्टलवर राष्ट्रीय डेटाबेस उपलब्ध होणार आहे. सरकारने हे पोर्टल 26 ऑगस्ट रोजी सुरू केलं आहे.  असंघटित क्षेत्रातील कामगारांना ई-श्रम पोर्टलच्या मदतीने ओळखले जाणार आहे. सर्व केंद्रीय कामगार संघटनेच्या नेत्यांनी ई-श्रम पोर्टलचे स्वागत केले आणि त्याचे यशस्वी प्रक्षेपण आणि अंमलबजावणीसाठी त्यांचे समर्थन वाढवले आहे. कामगारांची मोठी संख्या पाहता सरकारचे हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे देशातील असंघटित क्षेत्रातील कामगारांची मोठी संख्या पाहता सरकारचे हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. देशात आतापर्यंत असंघटित क्षेत्रातील कामगारांचा कोणताही डेटाबेस किंवा अचूक डेटा नाही, यामुळे सरकारी योजनांचा लाभ कामगारांपर्यंत पोहोचत नाही. ही कमतरता दूर करण्यासाठी, ई-श्रम पोर्टल सुरू केले जात आहे, जेथे कामगारांची संपूर्ण माहिती नोंदवली जाणार आहे. आकडेवारीनुसार, सध्या देशात सुमारे 37 कोटी असंघटित कामगार आहेत. सरकार म्हणते की, या उपक्रमाचा लाभ (ई-श्रम पोर्टलचा परिचय) आणि सरकारी योजनांचा लाभ सर्व असंघटित कामगार...

Occupancy Certificate म्हणजेच "भोगवटा प्रमाणपत्र" देण्याची बिल्डरची जबाबदारी आहे. - सर्वोच्च न्यायालय

इमेज
भोगवटापत्र म्हणजेच ऑक्युपेशन सर्टिफिकेट वेळेत मिळवून देण्याची जबाबदारी बिल्डरने पार न पाडल्यास त्याने फ्लॅटधारकाला नुकसान भरपाई द्यावी, हा ‘राष्ट्रीय ग्राहक मंचा’चा निकाल, सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. बांधलेल्या सदनिकेचे भोगवटापत्र म्हणजेच ऑक्युपेशन सर्टिफिकेट वेळेत मिळवून देण्याची जबाबदारी बिल्डरने पार न पाडल्यास त्याने फ्लॅटधारकाला नुकसान भरपाई द्यावी, हा ‘राष्ट्रीय ग्राहक मंचा’चा निकाल ग्राहकांना बहुमोल दिलासा देणारा आहे. मुंबईतील एका प्रकरणात निकाल देताना संबंधित बिल्डरने ग्राहकाला ४३ लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचा आदेशही मंचाने दिला असून हे प्रमाणपत्र मिळून देईपर्यंत दरमहा भाड्यापोटी तब्बल नव्वद हजार रुपये देण्याची सूचनाही केली आहे. या निकालाने फ्लॅटधारकांना दिलासा मिळणे स्वाभाविक आहे. बांधकाम उद्योग हा गृहस्वप्नाशी जोडला असल्याने ग्राहक अधिक संवेदनशील असतो. प्रसंगी तो हतबलही असतो. त्याचा फायदा घेऊन काही बिल्डर फसवणूक करतात. फसवणूक झालेले फ्लॅटधारक लाखांच्या संख्यने असतील. घर मिळविण्याची घाई झालेले ग्राहक कागदपत्रांची पूर्तता नंतर होईल या भरवशावर, बिल्डर दे...

वित्त विभागाने बाह्य यंत्रेणेद्वारे कामे करून घेण्यासाठी नऊ कंपन्या / संस्थेबरोबर (ठेकेदारामार्फत) करार केला असल्याचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून अति कुशल, कुशल, अर्ध कुशल, अकुशल इत्यादी तत्सम मनुष्यबळ पुरवठा सेवा पुरवताना खालील अटी शर्ती, सूचनांचे पालन व त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे बाबत.

इमेज
प्रति, माननीय मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य  वित्त विभाग, महाराष्ट्र शासन  सामान्य प्रशासन विभाग, महाराष्ट्र शासन कामगार विभाग, महाराष्ट्र शासन गृह विभाग, महाराष्ट्र शासन विषय : वित्त विभागाने बाह्य यंत्रेणेद्वारे कामे करून घेण्यासाठी नऊ कंपन्या / संस्थेबरोबर (ठेकेदारामार्फत) करार केला असल्याचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून अति कुशल, कुशल, अर्ध कुशल, अकुशल इत्यादी तत्सम मनुष्यबळ पुरवठा सेवा पुरवताना खालील अटी शर्ती, सूचनांचे पालन व त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे बाबत. सस्नेह जय महाराष्ट्र, महोदय / महोदया, शासनाच्या वित्त विभागाने नुकतेच परिपत्रक काढले असून, याबाबत कशा पद्धतीने कार्यवाही करावी हे स्पष्ट केले आहे. राज्य सरकारने बाह्ययंत्रणेकडून कामे करुन घेण्यासाठी नऊ सेवा पुरवठादार संस्थांची नियुक्ती केली आहे. त्यांच्याकडून अतिकुशल, कुशल, अर्धकुशल व अकुशल मनुष्यबळाचा पुरवठा करण्यात येणार आहे. वित्त विभागाच्या संबंधित परिपत्रकासंबंधीत विषयाच्या अनुषंगाने खालील नमूद अटी शर्तींचा सूचनांचा विचार करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे बाबत संबंधित विभाग यांचेकडून ता...

मोटार अपघात लवाद आणि नुकसाभरपाई

इमेज
चार वर्षांतील महाराष्ट्रातील अपघातांची संख्या आणि मृत्यू मोटार वाहन अपघात विमा  याविषयी माहिती घेऊयात. मोटार वाहन विभाग स्थापनेचा उद्देश राज्यातील औद्योगिक विकासामुळे ग्रामिण व नागरी क्षेत्रात परिवहन सेवेवर प्रचंड ताण पडलेला आहे. त्याचप्रमाणे जलद परिवहनासाठी दुचाकी वाहने, चार चाकी वाहन इत्यादीची सातत्याने भर पडत चाललेली आहे. याचवेळी रस्त्यावरील गर्दी वाढणे, अपघातांची संख्या वाढणे, वायुप्रदुषण इत्यादी बाबीसुध्दा प्रकर्षाने वाढीस लागलेल्या आहेत. दळणवळणाच्या अद्यावत सेवा, रस्त्यावरील वाहने,वायुप्रदुषण,वाहनांची नोंदणी,तपासणी,चालकांच्या अनुज्ञप्त्या इत्यादी कामामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झालेली आहे. ही कामे हाताळण्याकरिता तसेच मोटार वाहने अधिनियम,1988 च्या अंतर्गत तयार झालेले नियम,कर कायदे तसेच प्रवासी कर कायदे इत्यादीची अंमलबजावणी करण्याकरिता मोटार वाहन विभागांची निर्मिती करण्यात आलेली आहे. मोटार वाहन विभाग राबवित असणारे अधिनियम, नियम इत्यादी. मोटार वाहन अधिनियम, 1988 केंद्रिय मोटार वाहन नियम, 1989 महाराष्ट्र मोटार वाहन नियम, 1989 महाराष्ट्र मोटार वाहन कर अधिनियम, 1958 महाराष्ट्र मोटार ...

सायबर गुन्हेगारीची पद्धत, आणि फसवणुकीचे प्रकार.

इमेज
ग्राहक राजा जागा हो! सायबर गुन्हेगारी पासून सावध हो! 'सायबर युगातील' आपले प्रत्येक पाऊल सावधपणे टाकूया आणि सजग राहूया. तंत्रज्ञानात भयंकर वेगाने होणारी ही प्रगती जितकी मानवाच्या प्रगतीसाठी पूरक आहे तितकीच ती त्याच्या वैयक्तिक सुरक्षिततेसाठी घातकही ठरू शकते. सायबर गुन्ह्यांचे हे गुंतागुंतीचे जाळे किती भयानक ठरू शकते याची काही उदाहरणे- प्रत्येक गुन्हेगाराची एक विशिष्ट मानसिकता असते यावर बरेच मानसशास्त्रीय संशोधन झाले आहे. बहुतांशी हे गुन्हेगार अगदी तरुण वयातील मुले असतात, विशेषतः भारतात. या मुलांचे शालेय शिक्षणही पूर्ण झाले नसते.देशातील काही विशिष्ट गावं ही सायबर गुन्हेगारांची गावं आहेत. यातल्या प्रत्येक घरातल्या मुला-मुलींना सायबर गुन्ह्यासाठी वडीलधाऱ्यांमार्फत प्रशिक्षित केले जाते. इथल्या समाजात सायबर गुन्ह्यात सहभाग असलेल्या मुलाला लग्नाच्या बाजारात मोठा भाव असतो. मोठ्या परिश्रमाने गुन्ह्याचा शोध शोध लावत पोलिस तिथे पोहोचलेच तरी त्यावेळी हे संपूर्ण गावच रिकामे झाले असते. चेहरे नसलेल्या या गुन्हेगारांचा शोध म्हणूनच गवताच्या पेंडीतून सुई शोधण्यासारखा असतो. या अदृश्य ...

मेडीक्लेम म्हणजे, आपला विमा नाकारला तर काय करावे!

इमेज
मेडीक्लेम म्हणजे, आपला विमा नाकारला तर काय करावे! ग्राहक राजा मेडिक्लेम नाकारला तर काय करू शकतोस! ग्राहक जेव्हा आरोग्य विमा साठी एखादी कंपनी निवडतो तेव्हा त्या कंपनीचे ट्रॅक रेकॉर्ड तपासत नाही. केवळ कंपनीचे जे दलाल/एजंट असतात त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन कंपनी मध्ये पैसे भरतात.  वास्तविक ग्राहक हा राजा आहे आणि त्याने डोळसपणे कंपनी निवडली पाहिजे.  छत्रपती शिवाजी महाराज यांनी जसे सल्ला मसलती साठी आष्ठ प्रधान नेमले होते अगदी तसेच ग्राहकाने राजा म्हणून विविध एजंट, विमा कंपनी याचा अभ्यास करूनच, माहिती घेऊनच विमा कंपनी निवडली पाहिजे.  आता आपण गुगल द्वारे देखील असा सर्व्हे करू शकतो. फक्त एकच लक्षात घ्या की काही मोठे एजंट आहेत ते आपण गुगल सर्च केले की लगेच त्यांना गुगल द्वारे माहिती पुरवली जाते आणि नंतर प्रचंड प्रमाणात या विमा कंपनीचे एजंट चे फोन यायला सुरुवात होते. तेव्हा लगेच त्यास भुलू नका. जो जो फोन करतो त्यास आपण आरोग्य विमा देणार त्या बाबत माहिती ईमेल वर द्या असे सांगा. तोंडी माहिती वर विश्वास ठेऊ नका.  कोण कोणते आजार यात समाविष्ट आहेत, कोणते आजार समावि...

लाच केव्हा मागितली जाते, अवैध, बेकायदेशीर धंद्यांसाठी कशाप्रकारे हप्ते, लाच मागितले जातात याची माहिती घेऊयात.

इमेज
मित्रांनो कोणकोणत्या अवैध, बेकायदेशीर धंद्यांसाठी कशाप्रकारे हप्ते/लाच मागितले जातात याची माहिती पुढीलप्रमाणे घेऊयात. भ्रष्टाचार म्हणजे यंत्रणेला लागलेला महाभयंकर असा रोग आहे.असा रोग देशाच्या अर्थव्यवस्थेला खिळखिळा करू शकतो. भ्रष्टाचार म्हणजे गुन्हेगारी किंवा अप्रामाणिकपणाचा एक प्रकार आहे. अनेक कामे पूर्णत्वास येत नाहीत व रखडली जातात. भ्रष्टाचार उद्भवण्याची प्रमुख कारणे म्हणजे पैशासाठी चा हव्यास किंवा झटपट पैसे कमावण्याची लालसा आहे. तसेच, भ्रष्टाचार विविध मार्गांनी होऊ शकतो. बहुधा, अधिकार पदावरील लोक भ्रष्टाचाराला बळी पडतात. भ्रष्टाचार हा नक्कीच लोभी आणि स्वार्थी वर्तन प्रतिबिंबित करतो. ▪️ गृह विभाग व पोलिस विभागातील भष्टाचार प्रकरणी संबंधित लोकसेवकाने खालील प्रकारच्या वेगवेगळ्या मार्गाने महाराष्ट्रात शासकिय कार्यवाही करताना भष्टाचार केल्याचे / हप्ता घेतल्याचे आढळून येत आहे. १) घरगुती गॅस सिलिंडरचा काळाबाजार करतो म्हणून. २) बनावट डिझेल काळाबाजार करतो म्हणून ३) मटकाच्या धंदा चालवतो म्हणून. ४) जुगारचा धंदा  चालवतो म्हणून. ५) गुटखा विक्री करणतो म्हणून. ६) बेकाय...