वाहन टोइंग, नियमावली आणि नागरिकांचे अधिकार!

टोइंग व्हॅन मार्फत करण्यात येणारी कारवाई याचा हेतू वाहतुकीस होणारा अडथळा त्वरित दूर करणे हा असून केवळ दंड आकारणी असा नाही असे स्पष्ट आदेश आहेत. वाहन उचलण्यापूर्वी किंवा उचलत असताना त्याठिकाणी तो वाहन चालक आला तर नियमाप्रमाणे दंड वसूल करावा. जागेवर दंड वसूल केल्यानंतर वाहन टो न करता त्याच्या ताब्यात द्यावे असेही स्पष्ट आदेश आहेत. वाहन टोइंग करत असताना वापरायचे काही नियम याचे कार्यालयीन आदेश खालीलप्रमाणे आहेत. ● 1) टोईंग वाहनावर नेमण्यात येणारा अंमलदार पोलीस हवलदार वाहतूक किंवा त्यापेक्षा वरिष्ठ दर्जाचा अंमलदार नेमण्यात यावा. ● 2) टोईंग वाहनावरील अंमलदार हा टोइंग वाहनाचा प्रभारी असल्याने त्याच्या नियंत्रणाखालील टोईंग वाहनावरील चालक व कामगार काम करतील. ● 3) टोईंग व्हॅन वरील अमलदार कर्तव्य करीत असताना वाहनावरील कारवाई करण्यापूर्वी मेगाफोन द्वारे उद्घोषणा करून, त्यानंतर वाहन उचलून वाहन टोइंग व्हॅन वर ठेवतील. ● 4) टोईंग द्वारे कारवाई करत असताना वाहनचालक उपस्थित राहिल्यास त्याच ठिकाणी अंमलदार हा कायदेशीर कारवाई करून सशुल्क दंडाची पावती जागेवर देईल, वाहन उचलून घेऊन जाणार नाही व वाहन टोईंग...