पोस्ट्स

सप्टेंबर, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

एटीएम(ATM) मधून पैसे काढण्याची सुविधा आणि ग्राहकांचे अधिकार याविषयी माहिती घेऊयात.

इमेज
एटीएम(ATM) मधून पैसे काढण्याची सुविधा आणि ग्राहकांचे अधिकार याविषयी माहिती घेऊयात. बँकेतून पैसे काढण्याची प्रक्रीया एटीएम (ATM) च्या माध्यमातून अधिक सुकर झाली आहे. परंतु, काही वेळेस पैसे काढण्याची प्रोसेस पूर्ण होऊन देखील पैसे हातात येत नाहीत. अकाऊंटमधून पैसे कट झाल्याचा मेसेजही मोबाईलवर येतो. मात्र पैसे हाती पडत नाहीत. पैसे ऑनलाईन पाठविले परंतु समोरच्या व्यक्तीला भेटले नाहीत, मात्र तुमच्या बँक खात्यातून पैसे वजा झालेत. अशा प्रकारच्या परिस्थितीत घाबरुन, गोंधळून न जाता बँकेमध्ये लेखी तक्रार करा, त्याची पोच घ्या. अशा प्रकारांना बँक जबाबदार असते, एका ठराविक वेळेत बँकेने त्याची दखल घेऊन तक्रार निकाली  काढणे आवश्यक असते. जेव्हा कधी एटीएमचा व्यवहार रद्द होतो, तेव्हा ATM मधून ट्रान्झॅक्शन फेलची पावती मिळते. ही पावती तुमच्याकडे सुरक्षित ठेवा. कारण यामध्ये तुमच्या व्यवहाराचा रेफरन्स क्रमांक लिहलेला असतो. (त्या पावतीचा मोबाईल मध्ये फोटोही काढून ठेवावा). त्वरित तुमच्या खात्याचे स्टेटमेंट (Bank Account Statement) तपासा. जर तुमच्या खात्यातून पैसे वजा झाले असतील तर त्वरित तुमच्य...