लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अर्थात Anti Corruption Bureau(ACB) म्हणजे काय? नागरिकांनी तक्रार कशी करावी?

मित्रांनो या भागात आपण सरकारी कार्यालयात, सरकारी नोकराने अथवा लोकप्रतनिधींकडून तुमच्या सरकारी कामासाठी पैश्यांची मागणी केल्यानंतर काय करावे याविषयी माहिती आपण घेणार आहोत! सर्वसामान्य माणसाच्या तक्रारी कमी करायच्या असतील तर, प्रशासकीय यंत्रणा सुतासारखी सरळ करावी लागेल! न्यायासाठी फक्त कोर्टच आहे ही सर्वसामान्य माणसाची मानसिकता बदलावी लागेल! न्यायव्यवस्थेने सर्वसामान्य माणसाला वेळेत न्याय देण्यासाठी, मिळण्यासाठी पर्यायी यंत्रणा तयार केल्या आहेत. मात्र राजकारणी लोकांनी या संस्था महामंडळे यावर आपल्या मर्जीतील व्यक्तीला बसवण्याचा सपाटा लावला आहे. जग, बरेच पुढे गेलेलं आहे, राज्यकर्त्यांनी आता मानसिकता बदलून सकारात्मक राजकारण करावे! आमच्यामुळे न्याय मिळाला, आम्हीच न्याय देऊ शकतो, ही मानसिकता गेल्या काही वर्षात फोफावली आहे! ती जाणूनबजून सर्वसामान्य माणसाच्या मनावर बिंबवली जातेय, यामुळे तुम्ही एकतर या पार्टीचे व्हाल किंवा त्या पार्टीचे व्हाल. या मध्यस्थ लोकांना आपले हात धुऊन घेता येतील. मग प्रश्न असा येतो की एक तटस्थ नागरीक असू शकत नाही का? म्हणजे, प्रत्येक भारतीय नागरि...